आशाताई बच्छाव
जवखेडा ठेंग येथील श्री जनेश्र्वर महादेव मंदिर येथे शिवपंचायतन यज्ञ सोहळा व हनुमंतरायाची प्राणप्रतिष्ठा
जाफराबाद तालुका प्रतिनिधी – मुरलीधर डहाके
दिनांक 09/02/2025
सविस्तर वृत्त असे की जाफराबाद तालुक्यातील जवखेडा ठेंग येथील श्री जनेश्वर महादेव मंदीर श्री राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज गोसेवा आश्रम श्रीक्षेत्र जवखेडा ठेंग तसेच प.पू.स्वामी माधवगिरीजी बाबा आणि सर्व संतांच्या उपस्थितीत प्रतिवार्षिक शिवपंचायतान यज्ञ सोहळा व हनुमंतरायाची प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाची सुरुवात दिनांक 13 फेब्रुवारी गुरूवार या दिवशी होणार आहे.5 दिवस अन्नदान राहील सकाळी 10 ते रात्री 10 वाजे पर्यंत राहील. तसेच कार्यक्रमाची सांगता दिनांक 17 फेब्रुवारी या दिवशी होणार आहे.17 फेब्रुवारीला 2025 रोजी महाप्रसाद राहील.तसेच जालना जिल्ह्यातील आणि जाफराबाद तालुक्यातील भविक भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे श्री जनेश्र्वर स्वामी गोसेवा आश्रम जवखेडा ठेंग यांनी सुचविले आहे.