आशाताई बच्छाव
विद्यार्थ्याच्या सर्वांगिण विकासासाठी किडा व सांस्कतिक महोत्सव आवश्यक
माजी नगरसेवक प्रमोद पिपरे यांचे प्रतिपादन
गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ
संत जगनाडे महाराज न.प. उच्च प्राथमिक शाळा लांझेडा येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा शालेय बाल कीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन दिनांक 5 व 6 फेब्रुवारी 2025 रोजी करण्यात आले होते. या कार्यकमाच्या बक्षीस वितरण व समारोपीय कार्यकमाचे उद्घाटन भाजपचे लोकसभा समन्वयक तथा विधानसभा संयोजक तथा माजी नगरसेवक मा. प्रमोद पिपरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पालकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना माजी नगरसेवक प्रमोद पिपरे म्हणाले, बालकिडा व सांस्कृतिक महोत्सव निमित्याने विविध फॅन्सी ड्रेस, मॉडलिंग, थाली सजावट, चमचा गोळी, संगित खुर्ची, वकृत्व स्पर्धा, बॅटमिंटन, बुद्धीबळ स्पर्धा, कॅरम, प्रश्न मंजुषा, कबड्डी स्पर्धा इत्यादी खेळाचे व सांस्कृतिक कार्यकमाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना स्वतः मधील कला व कौशल्य दाखविण्याची संधी मिळाली आहे. अशा स्पर्धेमधुन विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळते तसेच भविष्यात अनेक स्पर्धा परिक्षा असो कि खेळामध्ये सुद्धा प्राविण्य प्राप्त करता येते असे सांगीतले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये किडा व कलागुण निर्माण करून त्यांच्या सर्वागिण विकासासाठी अशाप्रकारचे किडा व सांस्कृतिक महोत्सव आवश्यक असल्याचे प्रतिपादन भाजपचे लोकसभा समन्वयक तथा माजी नगरसेवक प्रमोद पिपरे यांनी केले.
कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी देवेद्र नैताम होते. प्रमुख पाहुणे म्हणुन माजी न.प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, पोलिस पाटील भाष्कर कोठारे, तुकाराम नैताम, नरेद्र भांडेकर, उईके सर इत्यादी उपस्थित होते. कार्यकमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पटले सर यांनी तर संचालन जुमनाके मॅडम यांनी केले. सांस्कृतिक महोत्सव व विविध स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.