Home बुलढाणा भूतदया! ती कॉलमच्या खड्यात पडली अन्….!

भूतदया! ती कॉलमच्या खड्यात पडली अन्….!

32
0

आशाताई बच्छाव

1001213411.jpg

भूतदया! ती कॉलमच्या खड्यात पडली अन्….!
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा शहरातील खालिद बिन वलीद नगर मध्ये घराच्या बांधकामासाठी खोदलेल्या कॉलमच्या खड्यात आज एक वगार पडली होती. या वगारीला बांधकाम मजुरांनी
सुखरूप बाहेर काढल्यानंतर या वगारने एकच धूम ठोकली.

बुलढाणा शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. नवनवीन वस्त्या तयार होत असून मोठ्या प्रमाणात नवीन घरांचे बांधकाम देखील सुरू आहे. आरटीओ ऑफिसच्या पाठीमागील भागात खालीद बिन वलीद नगर मध्ये मस्जिद जवळ सुरू असलेल्या बांधकामाच्या एका कॉलमच्या खड्यात एक वगार आज गुरुवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास पडली होती. दुपारी 1 वाजेच्या
सुमारास बांधकामासाठी ठेकेदार पोहोचला असता ही बाब त्याच्या लक्षात आल्यानंतर अगोदर दोन-तीन लोकांनी वगारला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु ते यशस्वी झाले नाही, म्हणून त्यांनी जवळ सुरू असलेल्या बांधकामावरील देऊळघाट येथील कामगारांना ही बाब सांगत मदत मागितली असता देऊळघाटचे तरुण धावून आले व सगळ्यांनी मिळून दोरीच्या सहाय्याने खड्यात पडलेल्या वगारला सुखरूप बाहेर काढले. ही वगार खड्याच्या बाहेर येताच तिने एकच धूम ठोकली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here