आशाताई बच्छाव
पी.एम. सूर्य घर मुफ्त बिजली योजना अति आवश्यक :- कार्यकारी अभियंता (प्रशासन) प्रिती फुले
महावितरण व एस. टी. महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय जनजागृती कार्यक्रम संपन्न
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)- स्थानीय महावितरण भंडारा मंडळ लघु प्रशिक्षण केंद्र भंडारा येथे आयोजित पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना अति आवश्यक का ? या विषयावर बोलताना श्रीमती प्रीती फुले कार्यकारी अभियंता महावितरण भंडारा मंडळ यांनी एस.टी. महामंडळ मधील ड्युअल सिस्टम ट्रेनिंग चे आई टी आई पवनी व भंडारा येथील प्रशिक्षणार्थी यांना मोलाचे मार्गदर्शन केले व वीज कशी मोफत होईल त्या बद्दल हि मार्गदर्शन केले तसेच अपघात कसे टाळू शकतो , वीज वाहिनीच्या खाली घर काम न करणे , शेतातील विजेच्या तारा खाली तनीस न ठेवणे इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले. महावितरण कंपनी ग्राहकांना विज अखंड कशी ठेवता येईल असे मार्गदर्शन केले.
या लघु प्रक्षिशण केंद्र भंडारा येथे वीज बाबद् विस्तृत विचार मंथन करण्यात आले. बँक ऑफ इंडिया चे पी.एम. रूफ टॉप सोलर विकत घेण्याची प्रक्रिया , लोन प्रक्रिया तसेच बँक प्रोडक्ट या विषयी कु. पद्मश्री मॅडम यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिक्षक अभियंता राजेंद्र कैलाश गिरी, कार्यकारी अभियंता (प्रशासन) प्रिती फुले, एस. टी. महामंडळ चे कामगार अधिकारी पराग शंभरकर , बँक ऑफ इंडिया चे मार्केटिंग सेल्स ऑफिसर कु. पद्मश्री मॅडम , लघु प्रक्षिशण केंद्रिय समन्वयक तथा उपकार्यकारी अभियंता अभिलाष सोमकुवर , एम एस आर टी सी चे सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक महेश राखडे , टेक्निशियन पंकज वानखेडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष सहकार्य केले.