Home जालना विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024  विधानसभा निवडणूक प्रक्रिया निष्पक्षपणे आणि निर्भय वातावरणात पार पाडावी

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024  विधानसभा निवडणूक प्रक्रिया निष्पक्षपणे आणि निर्भय वातावरणात पार पाडावी

23
0

आशाताई बच्छाव

1000909133.jpg

 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024

विधानसभा निवडणूक प्रक्रिया निष्पक्षपणे आणि निर्भय वातावरणात पार पाडावी
निवडणूक निरिक्षक (सामान्य) वेद पती मिश्र 
·        केंद्रीय निवडणूक निरिक्षक यांनी घेतला विधानसभा निवडणूक पूर्वतयारीचा आढावा 

जालना,दि.31,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ): विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा प्रशासनाने निवडणूकीच्या अनुषंगाने चांगली पूर्वतयारी केलेली असुन, ही निवडणूक प्रक्रिया निष्पक्षपणे आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या गांभिर्यपूर्वक पार पाडण्याचे निर्देश 101-जालना, 102-बदनापूर (अ.जा.) आणि 103 भोकरदन विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक (सामान्य) वेद पती मिश्र यांनी यावेळी दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सभागृहात आयोजित विधानसभा निवडणूकीच्या पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत श्री. मिश्र हे बोलत होते. यावेळी 99-परतूर आणि 100-घनसावंगी विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्री. नवीन, निवडणूक निरीक्षक (पोलीस) झेड ॲन विजया, निवडणूक निरीक्षक (खर्च) देव प्रकाश बमणावत जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रवार, अपर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी, बीएसएफचे अजयकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, उप जिल्हा निवडणुक अधिकारी शशिकांत हदगल यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

Previous articleगर्दीचे रूपांतर मतपेटीत होत नाही – कैलास गोरंटयाल —————————————-
Next articleजिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात एकुण 16 लाख 52 हजार 511 मतदार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here