आशाताई बच्छाव
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंकजाताई मुंडे यांच्या दसरा मेळाव्यांची जय्यत तयारी
मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा
बीड/आष्टी दि: ०९ ऑक्टोंबर २०२४ बीड जिल्ह्यातील आष्टी / पाटोदा सीमेवरती संत भगवान बाबा यांचे जन्मगाव सावरगाव घाट या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून पंकजाताई मुंडे दसरा मेळावा घेत आहेत. व गोपिनाथ मुंडे साहेबांनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची परंपरा जपत आहेत. या मेळाव्याला वंचितांचा शोषितांचा व बहुजनांचा मेळावा म्हटले जाते. या मेळाव्याकडे दरवर्षीच अखंड महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असते की मेळ्यामधून पंकजा मुंडे काय बोलणार यावर्षी देखील तीच उत्सुकता महाराष्ट्राला लागली आहे. विधानसभेच्या तोंडावरती दसरा मेळावा असल्यामुळे अधिकच उत्सुकता दिसून येत आहे. सावरगाव घाट येथे दोन ठिकाणी ३००/३०० एकर मध्ये पार्किंगचे नियोजन केले आहे. तर भव्य दिव्य अशी भगवान बाबांची असलेली स्मृतीचे रंग रांगोळीचे काम देखील अंतिम टप्प्यात आले आहे. सभा स्थळाची देखील साफसफाई व आलेल्या भाविक भक्तगणाची कुठलीही गैरसोय होऊ नये असे ग्रामस्थांकडून नियोजन करण्यात येत आहे.