Home सामाजिक निवडणुकीतील राजकारण राजकारणात प्रामाणिकपणा उरला नाही. —

निवडणुकीतील राजकारण राजकारणात प्रामाणिकपणा उरला नाही. —

17
0

आशाताई बच्छाव

1000819092.jpg

निवडणुकीतील राजकारण
राजकारणात प्रामाणिकपणा उरला नाही. — स्वप्निल देशमुख ( पत्रकार)

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार आहेत. जेव्हा आम्ही राजकारण, लोकशाही, प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी बद्दल बोलतो तेव्हा महत्त्वाचा घटक म्हणजे संविधानाचा उल्लेख हा आपोआप होतोच. नवीन लोकप्रतिनिधी जेव्हा राजकारणात उरतो तेव्हा तो शपथ घेतो की मी फक्त लोकांच्या हितासाठी झटणार, लोकांच्या भल्यासाठी काम करत राहणार. पण राजकारणात पाऊल ठेवताच लोकप्रतिनिधी सगळं विसरून जातात आणि भ्रष्टाचाराबरोबर हातात हात घालून पुढची वाटचाल करत राहतात. काळा पैसा भ्रष्टाचार करुन कसा कमवायचा हे राजकारणात उतरलेल्या लोकप्रतिनिधींकडून शिकावं असं मला वाटतं.
मी एक साधा आणि सोप्पा प्रश्न आमच्या सामान्य जनतेला विचारू इच्छिते, आपण ज्या लोकप्रतिनिधींना निवडून आणतो अशा हया आपल्या राजकीय नेत्यांकडून आपल्याला काय अपेक्षा असते? मुळात लोकांनी ही महत्त्वाची गोष्ट जाणून घेण्याची आणि त्यांच्यावर विचार करण्याची गरज आहे की लोकप्रतिनिधी हे लोकांचे प्रतिनिधी असतात, आणि लोकांच्या अधिकारांचे हे प्रतीकात्मक राखणदार असतात. सामान्य जनतेची आपल्या प्रतिनिधींकडून अपेक्षा असते की आपण आपले मौल्यवान मत देऊन निवडून आणलेल्या प्रतिनिधीने आपले ऐकावे, आपल्या प्रतिनिधींनी आपल्या मतदारांशी प्रामाणिकपणे वागावे, समाजात सामान्य लोकांच्या अडीअडचीणींना दूर करून त्यांना समाजात चांगल्या सुविधा प्राप्त करून द्याव्यात, सामान्य जनतेशी संपर्क साधावा, त्यांना काय हवे नको ते पहावे. लोकप्रतिनिधींनी असे काहीतरी करायला पाहिजे की सामान्य जनतेचा विश्वास त्यांनी जिंकायला हवा. सामान्य जनता ही खूप काही सहन करत असते, आपल्या मानवी अधिकारांसाठी लोक झटत असतात अशा ह्या परिस्थितीत लोकप्रतिनिधींनी जनतेला साथ देऊन त्यांच्या बरोबर उभे राहून लोकांच्या मानवी हक्काची, अधिकारांची राखण करण्यासाठी मदत करायला हवी. महिलावर्गासाठी नवीन योजना आखल्या जाव्यात आणि त्या योजना पोहोचल्या की नाही ह्याची विचारपूस करणे, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक ह्या सर्व क्षेत्रात लोकांना योग्य सुख, सोयी, संधी मिळतात की नाही, लोकांना समान वागणूक मिळते की नाही, हे सर्व काही पाहण्याचं कार्य हे लोकप्रतिनिधीचं असतं. पण खरं बघायला गेलो तर, लोकप्रतिनिधी या सगळ्या गोष्टी राजकारणात निवडणुकीच्यावेळी दाखवायला करतात.एकदा का त्या लोकप्रतिनिधींना मते मिळाली आणि निवडून आले, की त्यांना पंख फुटतात. मग ते समजाला आणि सामान्य जनतेला गृहीत धरतात. निवडून येणाऱ्या उमेदवाराला त्या मतदारसंघाचा आमदार आणि राज्याच्या विधानसभेचा सदस्य अशा दोन स्तरांवर वावरायचे असते. मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने त्याने आपल्या मतदारसंघातील लोकांचे प्रश्न आणि भावना शासनापर्यंत पोहोचवणे, हे त्याचे काम असते. लोकप्रतिनिधींनी लोकांच्या हितासाठी, लोकांच्या भल्यासाठी काम करावे असे मला वाटते. क्वचित लोकप्रतिनिधी बघायला मिळतात जे खरोखरच लोकांच्या भल्यासाठी, लोकांच्या हितासाठी काम करतात. लोकप्रतिनिधींनी लोकांच्या भल्यासाठी जमेल तेवढे चांगले कार्य करावे. आपले खिसे पैशांनी न भरता, लोकांच्या आणि समाजाच्या कल्याणासाठी त्या पैशांचा चांगला वापर करावा. लोकांनी निवडून आणल्यामुळे लोकांसाठी झटण्याची आपली तयारी ठेवावी.हे आजच्या नवीन लोकप्रतिनिधींना ध्यानात ठेवणे गरज आहे. निवडणूक जवळ आली की लोकप्रतिनिधींना, राजकीय नेत्यांना सामान्य जनतेची आठवण येते. निवडणूक जवळ आली की त्यांना सामान्य लोकांचा आधार घ्यावा लागलो मते मिळविण्याकरीता. कुठल्याही थराला जाण्याची तयारी हे लोकप्रतिनिधी ठेवतात. राजकारणात सत्ता मिळवण्यासाठी मी काहीही करायला आणि कुठल्याही थराला जायला तयार आहे आणि हे करताना मी मागेपुढे पाहणार नाही, ह्या वरून अंदाज येतो की सत्तानिवडणूक जवळ आली की लोकप्रतिनिधींना, राजकीय नेत्यांना सामान्य जनतेची आठवण येते. निवडणूक जवळ आली की त्यांना सामान्य लोकांचा आधार घ्यावा लागलो मते मिळविण्याकरीता. कुठल्याही थराला जाण्याची तयारी हे लोकप्रतिनिधी ठेवतात. राजकारणात सत्ता मिळवण्यासाठी मी काहीही करायला आणि कुठल्याही थराला जायला तयार आहे आणि हे करताना मी मागेपुढे पाहणार नाही, ह्या वरून अंदाज येतो की सत्ता माणसाला घडवते आणि सत्ताच माणसाचा नाश करते. निवडणुकीच्यावेळी आमदार, राजकीय नेते आपापसात कुत्र्या- मांजरासारखे भांडत, एकमेकांची खिल्ली उडवतात हे आम्ही सगळ्यांनी पाहिले आहे. सत्ता मिळवण्यासाठी हवं ते करतात आणि वेळ आली तर स्वतःचं आस्तित्व विसरून जातात. राजकारणात निवडून येण्याची शर्यत आणि एकामेकांना खाली पाडण्यात हे माहीर असतात त्यात काही शंकाच नाही. निवडणुकीच्यावेळी प्रचार करताना राजकीय नेते सामान्य लोकांच्या पायांकडे येतात मत मागण्यासाठी आणि एकदा काय निवडणूक संपून मते मिळाली की पुढची पाच वर्षे तोंड दाखवत नाहीत असा लोकांचा समज आहे. राजकारणात एकामेकांवर टिका करणारे लोकप्रतिनिधी लोकांना पटवण्याचा प्रयत्न करतात की मी किती खरा राजकीय नेता आहे. पण खरं तर कुठला राजकीय नेता खरा हे ठरवण्यात आमची सामान्य जनता सक्षम आहे.भ्रष्टाचाराशिवाय राजकारण आणि राजकारणाशिवाय भ्रष्टाचार चालत नाही. राजकारण आणि भ्रष्टाचाराची मैत्री ही वर्षानुवर्षे चालत आलेली एक प्रथाच बनली आहे. भ्रष्टाचाराची पाळेमुळे कुणीही उपटून काढू शकत नाही. अनियंत्रित व्यवस्था आणि त्यामुळे निर्माण झालेला भ्रष्टाचार हा सध्या आम्हाला सगळीचकडे पहायला मिळतो. पण एक मात्र आहे की, भ्रष्टाचाराला नष्ट करणे हे मतदारांच्या म्हणजेच सामान्य जनतेच्या हातात आहे. खरंतर भ्रष्टाचार प्रशासनाच्या विविध पातळ्यांवर कसा पसरलाय हे ताज्या नोकर भरती आणि नोक-या देण्याच्या घोटाळ्यातून गोमंतकीयांना दिसून आले आहे. भ्रष्टाचाराची गुलामगिरी तशीच ठेवायची, की काही बदल घडवून आणायचा हे लोकांनी निवडणुकीच्या वेळी मत देताना ठरवणे महत्त्वाचे असते. लोकांनी आम्ही भ्रष्टाचारात सहभागी होणार नाही असा संकल्प करुन आणि आपले आयुष्य लोकांसाठी झटण्याची तयारी ठेवणारा प्रतिनिधी निवडून आणायची तयारी ठेवण्याची गरज आहे. समाजकारणाच्या नावावर राजकारण करणाऱ्याला मुख्य प्राधान्य द्यायचे, की पात्र असलेल्या लोकप्रतिनिधीला प्राधान्य देऊन निवडून आणायचे हे मतदारांच्या हातात असते. सध्या पेट्रोलचे दर बघता, पेट्रोल प्रतिलीटर १०० रुपयांवर पोहोचले आहे. तसं बघितल तर आता सगळंच महाग झालं आहे. पण जो तो राजकीय पक्षाचा उमेदवार पुढे येऊन सांगतो की आपल्या अमुक-अमुक पक्षाला मत द्या, सत्तेवर आल्यानंतर हे दर आम्ही कमी करू. अशा ह्या भ्रष्टाचार पसरलेल्या काळात निवडणुकीच्यावेळी मते मिळवण्याकरिता अनेक आश्वासने देताना आम्हाला राजकीय नेते दिसतात.तरुणपिढी ही एक होतकरू पिढी आणि आपले स्वत:चे ठाम मत मांडणारी पिढी मानली जाते. पण निवडणूक जवळ आली की तरुणपिढी वेगवेगळ्या आमिषाच्या मागे धावताना दिसून येते. दारू वाटप, पैसे वाटप, मद्य, आकर्षक वस्तूवितरण अशा प्रकारे लोकांकडून मोठ्या प्रमाणात मते मिळवून घेतली जातात. प्रचार करण्यासाठी दिलेल्या पैशांच्या मागे धावताना आणि आमिषाच्या आहारी गेलेल्या आजच्या तरुणपिढीला पाहून ह्या सर्व गोष्टींचा तरूणपिढीवर किती वाईट परिणाम होत आहे ह्याची मला खंत वाटते. तरुणपिढीला सरकारी नोकऱ्यांच्या खोट्या आश्वासनांचे आमिष दाखवून प्रचाराच्या वेळी राजकारण करत राजकीय नेते आपल्याकडे ओढताना दिसतात. योजना, सरकारी नोकऱ्यांची आश्वासने अनेक जण देतात पण त्याची पूर्तता केली जाते की नाही हे ह्या आजच्या पिढीने आर्वजून विचार करण्याची गरज आहे. योग्य उमेदवार निवडणे हे आपल्या स्मार्ट तरुणपिढी पुढील आव्हान आहे. बेरोजगारी, तरुणपिढी हा मुद्दा काही नवीन नाही. प्रत्येक घरात, प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात अशी कितीतरी बेरोजगार तरुणपिढ़ी आम्हाला पहायला मिळते. सुशिक्षित असुनही रोजगार नसल्याने तरुणपिढी चिंतेत दिसून येत. येत्या निवडणुकीत मतदारांनी आपल्या तरुणपिढींनी विचार केला पाहिजे की आपले एकच मत क्रांती घडवू शकते असा विचार करून मतदान करायची गरज आहे.

स्वप्निल बापू देशमुख (पत्रकार)
मो. 9552381088

Previous articleनविन मोंढा जालना येथुन ट्रकची चोरी
Next articleशासनाने शंभर रुपयाचे मुद्रांक बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा – नाशिक चवरे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here