Home बुलढाणा वारकरी, डेस्टीस्ट , आयुर्वेदीक भवन व विविध विकासकामासाठी १५ कोटीचा निधी मंजूर,आमदार...

वारकरी, डेस्टीस्ट , आयुर्वेदीक भवन व विविध विकासकामासाठी १५ कोटीचा निधी मंजूर,आमदार संजय गायकवाड यांनी खेचून आणला पुन्हा विकास निधी

36
0

आशाताई बच्छाव

1000805504.jpg

वारकरी, डेस्टीस्ट , आयुर्वेदीक भवन व विविध विकासकामासाठी १५ कोटीचा निधी मंजूर,आमदार संजय गायकवाड यांनी खेचून आणला पुन्हा विकास निधी
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलढाणा जिल्ह्य विधानसभा मतदारसंघाचे धर्मवीर लाडके धडाडीचे आमदार संजय गायकवाड यांनी शेवटच्या टप्प्यात ही आपला विकासाचा धडाका सुरूच ठेवला आहे आता त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत बुलढाणा नगरपरिषद व मोताळा नगरपंचायत ला तब्बल १५ कोटी रुपयाचा विकास निधी मंजूर करून आणला आहे. या निधीच्या माध्यमातून वारकरी, डेन्स्टीस्ट,आयुर्वेदीक भवन तसेच विविध विकासाची कामे केली जाणार आहे.
बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा नगरपरिषद अंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण योजना साठी विकास निधीची मागणी केली होती यामध्ये बुलढाणा नगर परिषद क्षेत्रात मागील अनेक दिवसापासून वारकरी भवन बांधकाम मागील अनेक दिवसापासून सुरू आहे सदर इमारतीच्या विस्तारीकरण व फर्निचर करिता ५० लाख रुपये तसेच, डेन्स्टीस्ट, आयुर्वेदीक व होमियोपॅथीक भवन साठी ६५ लाख रुपयाचा निधी खेचून आणला आहे. यासह हुतात्मा स्मारक विकास करण्यासाठी ५० लाख, धर्मवीर आखाडा ते सुवर्ण गणेश मंदिर रस्ता विकसित करण्यासाठी ७० लाख, अध्यापक विद्यालय ते जिजामाता विद्यालय यांच्यामधील डीपी रोड विकसित करण्यासाठी ५० लाख, प्रभाग क्रमांक दोन, तीन,चार मधील विविध कामासाठी तीन कोटी, छत्रपती शिवाजी महाराज सभागृहांमधील न्युरल चे काम करीत आहेत ३० लाख, नंदू राजपूत यांच्या घरासमोरील खुला भूखंड विकसित करण्यासाठी १२ लाख, कराळे ले आउट मधील महादेव मंदिराचा भूखंड विकसित करण्यासाठी १३ लाख, गणेश नगर ते चंद्रमणी नगर, राजमाता चौक ते क्रीडा संकुल रस्ता विकसित करण्यासाठी ५० लाख, प्रभाग क्रमांक ९ मधील हनुमान मंदिर परिसरातील सभामंडप विकसित करण्यासाठी एक कोटी, प्रभाग क्रमांक १४ मधील राम मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी ५० लाख, छत्रपती सेवा संघ भवन बांधकामासाठी ५० लाख, बुलढाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राची उर्वरित कामे करिता २ कोटी, पोळा चौक येथे कमान विकसित करण्यासाठी १० लाख, शहरातील खुले भूखंड विकसित करण्यासाठी तसेच रस्ते नाले व पूल विकसित करण्यासाठी दीड कोटी, कारंजा चौक येथील व्यास गार्डन मध्ये सभागृह बांधकामासाठी ५० लाख, रिलायन्स पेट्रोलपंप ते आयटीआय कॉलेज रस्ता विकसित करण्यासाठी १ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासोबतच मोताळा नगरपंचायत येथे मोताळा नगरपंचायत जुना मलकापूर रोड विकसित करण्यासाठी ५० लाख असे एकूण १५कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Previous articleवाशिममध्ये विकृत बुद्धीच्या व्यक्तीने दोन बक-या टाकल्या विहिरीत
Next articleमराठेशाहीचा गौरवास्पद इतिहास जतन करण्यासाठी… ‘मोडी लिपी’ प्रशिक्षणवर्ग!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here