आशाताई बच्छाव
आधुनिक युगामध्ये महिलांच्या कला गुणांना वाव मिळाल्यास महिलाही विविध क्षेत्रांमध्ये अव्वल ठरतील:—
भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांचे प्रतिपादन
लोकमत सखी मंचच्या वतीने सुपर मॉम कार्यक्रमाचे आयोजन
गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ–
प्रत्येक महिला स्वतःच्या संसाराची काळजी घेण्यासाठी सातत्याने लढत असतात.महिला गृहिणी असो,नौकरदार असो ,गरीब घरातील असो वा श्रीमंत तिला कुटुंबाप्रती सर्व कर्त्यव्य पार पाडावी लागतात.
या सर्व दैनंदिन व्यापातून महिलांना आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी वेळ भेटत नाही पुरुषाप्रमाणे महिलांमध्ये सुध्दा विविध क्षेत्रामध्ये नाविन्याने काम करण्याची क्षमता असते परंतु त्यांना संधी मिळत नाही.संधी मिळाली तर संधीचे सोने करणार असे प्रतिपादन भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांनी केले.
लोकमत सखी मंच यांच्या वतीने सुपर मॉम कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक चामोर्शी रोडवरील कात्रटवार सभागृह येथे करण्यात आले होते.यावेळी सौ.योगीताताई पिपरे यांनी लोकमत सखींना संबोधित करतांना बोलत होत्या.
यावेळी राजुभाऊ कात्रटवार ,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. मिलिंदजी नरोटे, रविभाऊ भांडेकर,नलीनीताई पोटकर,सीमाताई दुर्गे,ज्योतिताई उंदिरवाडे,अर्चनाताई मुळे,लोकमत सखी मंच संयोजिका रश्मीताई आखाडे व लोकमत सखी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश उंदिरवाडे यांनी केले.