Home नांदेड मुक्रमाबाद येथे ग्रामस्वच्छता जनजागरण रॅली

मुक्रमाबाद येथे ग्रामस्वच्छता जनजागरण रॅली

48
0

आशाताई बच्छाव

1000778132.jpg

मुक्रमाबाद येथे ग्रामस्वच्छता जनजागरण रॅली

मुखेड युवा मराठा न्युज नेटवर्क बस्वराज स्वामी वंटगिरे मुक्रमाबाद

मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने २४ सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय सेवा योजना दिन तसेच स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत महाविद्यालयाच्या मुख्य गेट पासून ते गावातील मुख्य रस्त्याने ग्राम स्वच्छता जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास महाविद्यालयातील स्वयंसेवक-स्वयंसेविका विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसराची स्वच्छता केली. आणि नंतर ग्राम स्वच्छता जनजागरण रॅलीमध्ये सहभागी झाले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ.मा.म.गायकवाड, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ आर.बी. मादळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी कार्यक्रमाधिकारी डॉ जे. पी.काळे, डॉ बालाजी खराबे, डॉ गणी शेख , प्रा आर. एस. ढोकाडे, डॉ रमाकांत बिडवे , यांची विचारपीठावर उपस्थिती होती. सर्वप्रथम सभागृहात डॉ प्राचार्य डॉ विवेक इनामदार सर यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा गांधी व स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन केले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री मुकुंदराज जाधव तर प्रमुख वक्ते स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी कार्यक्रमाधिकारी तथा राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ एस.एल.सकनुरे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन व ग्राम स्वच्छता यावर सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन गायकवाड यांनी केले तर उपस्थितांचे आभार मादळे यांनी मानले. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ रविंद्र बाविस्कर यांनी स्वच्छतेची शपथ दिली. या कार्यक्रमास प्रा भारतभूषण बाळबुध्दे, डॉ भरत मुस्कावाड,क्रिडा विभागप्रमुख डॉ दिलीप काळे, डॉ एकनाथ भिंगोले, डॉ विलास पवार, प्रा अंकुश शिंदे, डॉ एम. एम. सय्यद, डॉ एन. एच. पांचाळ, यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शाखेचे विद्यार्थी व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सदरील उपक्रमास उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून श्री सादगिरे बालाजी,श्री निळकंठे दत्ता,श्री शिदे पिटू यांनी परिश्रम घेतले. हा कार्यक्रम महाविद्यालयातील अल्पो उपहारानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Previous articleमुक्रमाबाद येथील आरोग्य कर्मचा-यावर आली उपासमारीची वेळ
Next articleमाता नसेची तु वैरीणी वाशिम जिल्ह्यात जीवंत अर्भक फेकले रस्त्यावर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here