आशाताई बच्छाव
.बदनापूर तालुक्यातील प्रकार सहा आरोपींनी रस्त्यात अडवून चाकूहल्ला करत तरुणीला केले जखमी
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 14/09/2024
बदनापूर तालुक्यातील निकळक (अकोला )शिवारात पहाटेच्या साडेपाच वाजेच्या सुमारास पोलीस भरती साठी धावण्याचा
सराव करणा-या एका १७ वर्षीय अल्पवयीन तरूणीस दुचाकीवरून आलेल्या अनोळखी सहा जणांनी अडवून विनयभंग केला.त्यानतंर तिला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून हाता -पायावर व पोटावर चाकूहल्ला करत जखमी केल्याची धक्कादायक घटना निकळक-वाल्हा रोड लगत घडली.या प्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून अनोळखी सहा तरूणा विरूद्ध बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दिलेल्या माहिती नुसार पिडीत तरुणी ही पोलीस भरती साठी धावण्याचा सराव करण्यासाठी निकळक शिवारातील वाल्हा रस्त्याने जात असताना.काही अंतरावर तिन दुचाकीवरून आलेल्या अनोळखी सहा जणांनी.तरूणीला अडवून हाताला धरून रस्त्याच्या कडेला ओढत नेत तिचा विनयभंग केला.संशयितांनी तरुणीच्या पोटावर, पायावर व हातावर चाकूने वार करून जखमी केले. जर पुन्हा या रस्त्याने दिसली तर तुला व तुझ्या वडिलांना जिवे मारुन टाकू, अशी धमकी दिली.दरम्यान , या घटनेनंतर तरूणी घरी आल्यानंतर झालेला प्रकार कुटुंबियांना सांगितला.कुटुंबियांनी तरूणीला आधार देत बदनापूर पोलीस ठाण्यात आणले याप्रकरणी पिडित तरूणीच्या फिर्यादीवरून अनोळखी सहा जणांविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार व अन्य कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास.उपनिरीक्षक ए.जी जैस्वाल करत आहेत. आमदार नारायण कुचे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आयुष नोपानी, पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, बदनापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुदाम भागवत,महिला आयोगाच्या फौजदार गायकवाड आदींनी घटनास्थळी व मुलींच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.मराठाआरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे यांनीही घटनेचा निषेध केला.
अप्पर पोलीस अधिक्षक आयुष नोपानी यांनी घटनास्थळी भेट दिली असून सदरील घटनेची सखोल चौकशी करून पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून.दोन आरोपींना पकडण्यात आले असून उर्वरित आरोपी लवकरच पकडण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.