Home मुंबई कॉंग्रेसच्या पोटात एक,ओठात एक –सरसेनानीआनंदराज आंबेडकर

कॉंग्रेसच्या पोटात एक,ओठात एक –सरसेनानीआनंदराज आंबेडकर

287
0

आशाताई बच्छाव

1000740078.jpg

कॉंग्रेसच्या पोटात एक,ओठात एक –सरसेनानीआनंदराज आंबेडकर
मुंबई (संजीव भांबोरे )कॉंग्रेस हा पक्ष कधीही आरक्षणाच्या बाजूने नव्हता. या देशामध्ये एस्सी आणि एसटी समूहांना जे आरक्षण मिळाले ते केवळ आणि केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मिळाले आहे. एवढेच नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या 340 कलमानुसार ओबीसींना सुद्धा आरक्षण दिले होते; परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कॉंग्रेसने नव्हे तर व्ही. पी. सिंग सरकारच्या काळात करण्यात आली. एवढेच नाही तर कॉंग्रेस डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘भारतरत्न’ हा पुरस्कार सुद्धा देऊ शकली नाही. भारतरत्न हा पुरस्कार व संसदेत बाबासाहेबांचे तैलचित्र लावणे यासाठी व्ही. पी. सिंग सरकार केंद्राच्या सत्तेत यावे लागले. हे लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा वापर करतात; मात्र बाबासाहेबांचा योग्य तो सन्मान करीत नाहीत.” असे उद्गार रिपब्लिकन सेनेचे सर सेनानी आनंदराज आंबेडकर यांनी काढले. ते डॉ.आंबेडकर भवन दादर मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले, “एस्सी, एसटी, ओबीसी यांचे आरक्षण संपवणे हीच कॉंग्रेसची मानसिकता आहे. ही मानसिकता कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन केलेल्या आरक्षणविरोथी वक्तव्यावरून स्पष्ट होते.” मंडल आयोगाचा अहवाल धूळ खात ठेवणे यामागे ओबीसींना आरक्षण न देण्याचा कॉंग्रेसचा कुटील डाव होता; असे सांगून कॉंग्रेसचे खायचे दात वेगळे व दाखवायचे दात वेगळे आहेत अशी पुष्टी त्यांनी जोडली. एस्सी एसटी ओबीसींना सावध करताना त्यांनी आवाहन की, कॉंग्रेसवाले तोंडाने काहीही बोलत असले तरी आतापर्यंत संविधानात शंभर वेळा बदल करण्यात आला तेव्हा हे काय करीत होते? शेवटी सर सेनानी आनंदराज आंबेडकरांनी आरक्षणविरोथी पक्षांना आव्हान दिले की, आरक्षण संपवण्याच्या गप्पा मारणाऱ्या पक्षांना धडा शिकवल्याशिवाय रिपब्लिकन सेना स्वस्थ बसणार नाही. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष समाजभूषण काकासाहेब खंबाळकर, मुंबई प्रदेशाध्यक्ष प्रकाश भाऊ खंडागळे, महाराष्ट्र प्रदेश सचिव श्रीपती ढोले, महाराष्ट्र कार्यकारीणी सदस्य विनोद काळे, रिपब्लिकन विद्यार्थी सेना मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष गाडे, मुंबई युवाध्यक्ष बाबासाहेब गायकवाड यांची उपस्थिती होती.

Previous articleहेल्थ एटीएम मशीन मानद नामांकन विनाच! तालुक्यातील ६ आरोग्य केंद्रात हेल्थ एटीएम ३ आरोग्य केंद्र एटीएम विना!
Next articleनाशिक व पाचोर्‍याच्या चोरट्यांकडून चोरीच्या सहा दुचाकी जप्त
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here