आशाताई बच्छाव
विश्व हिंदू परिषद बजरंग दल कडून ओंकारेश्वर ते पातुर्डा कावड यात्रा! १२ दिवसात २४० किलोमीटर चालणार कावडधारी
ज्ञानेश्वर पाटील युवा मराठा न्यूज ब्युरो चीफ बुलढाणा:
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने ओंकारेश्वर येथून पातुर्डा कावड यात्रा काढण्यात आली.१५ऑगस्ट रोजी ओंकारेश्वर येथून या यात्रेला सुरुवात करण्यात आली.
देशातील हिंदू धर्म गायीला माता मानतो, ज्यामध्ये 33 कोटी देवी-देवतांचा वास आहे. गायींची हत्या करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, तसा कायदा आहे पण कारवाई होत नाही. त्यामुळे गोहत्या आणि गोवंश हत्या बंद झाल्याच पाहिजेत, असा पवित्रा घेत पातुर्डा येथील कावडधारी यांनी ओंकारेश्वर ते पातुर्डा बु पर्यंत कावड यात्रा काढण्याचा संकल्प केला. 15 ऑगस्ट,ला भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनी, कावड यात्रेकरूंनी ओंकारेश्वर येथून श्री संत गजानन महाराजांच्या मंदिराजवळून राष्ट्रगीत गाऊन आणि तिरंग्याला वंदन करून कावड यात्रेला सुरुवात केली.
या प्रवासात अडीच क्विंटल कावड, 21 कलश, 6 फूट श्री हनुमान मूर्ती घेऊन 105 कावडधारी 12 दिवसांत 240 किलोमीटरचा पायी प्रवास करून 26 ऑगस्ट रोजी कावड पातुर्डा येथे पोहोचवतील. हा कावड ओंकारेश्वर, सनवत, देशगाव, रुस्तमपूर,असीरगड, बुरहानपूर, डोंगरगाव, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र राज्य चेक पोस्ट, जळगाव जामोद, संग्रामपूर मार्गे पातुर्डा येथे पोहोचेल. 26 ऑगस्ट रोजी
गावातून कावडची भव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
🛑 १५ ऑगस्ट रोजी ओंकारेश्वर वरून कावड यात्रेला सुरुवात केलेल्या या यात्रेकरूंचे दिनांक १८ऑगस्ट रोजी रात्रीचे मुक्काम हे बुऱ्हानपूर मधील अशीरगड येथे होणार असून दुसरे दिवशी येथील शिव मंदिरात ज्या ठिकाणी असे मानले जाते की ब्रह्म मुहूर्तामध्ये अश्वत्थामा प्रथम भगवान शिवाची पूजा करण्यासाठी जातो. यावेळी त्यांच्या आगमनाची जाणीव ना कोणता आवाज येत नसून. सकाळी मंदिराचे दरवाजे उघडण्यापूर्वी ते भगवान भोलेनाथाची पूजा करून निघून जातात,अशी येथील पुजारींची श्रद्धा आहे. अशा पुरातन शिव मंदिरात मोठ्या भव्य दिव्य महा अभिषेकाला आम्ही कावडधारी उपस्थित राहणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषद, बजरंग दल,कावडधारी यांच्याकडून मिळाली आहे.