आशाताई बच्छाव
महाराष्ट्रत लवकरच निवडणूक आचारसंहिता? निवडणूक आयोगाचा बिगुल वाजला,ठान मांडलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करा. आयोगाने दिले संकेत.
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक
अमरावती.
तीन वर्षापासून एका ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या राज्य प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या त्वरित बदल्या करा, असा पाठवा निवडणूक आयोगाने जारी केला आहे. याचा अर्थ विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागणार? असे संकेत आयोगाने ३१ जुलाई २०२४ रोजी जारी केलेल्या पत्राद्वारे दिलेल्या आहेत. निवडणूक आयोग शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निवडणूक काळात धोरण अवलंबित असते. निष्पक्षपणे निवडणूक घेण्यासाठी आयोग लोकांची संबंध येणाऱ्या राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे निर्णय घेऊन या अधिकाऱ्यांना एका ठिकाणी सलग तीन ते चार वर्षे झालेली आहेत. अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या अन्य जिल्ह्यात करतात.२०२४मध्ये ऑक्टोंबर, नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याने आयोग कामाला लागलेला आहे. गृह जिल्ह्याच्या बाहेर काढा, महाराष्ट्रातील ज्या शासकीय अधिकाऱ्यांना एका जागेवर तीन वर्षे पूर्ण झालेले आहे, अशा अधिकाऱ्यांची संबंधित विभागाने यादी तयार करून अशा अधिकाऱ्यांची बदली गृह जिल्हा बाहेर करावी, असा आदेश देण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांना जिल्ह्यातून बाहेर पडावे लागेल, हे विशेष. यात राज्यसेवेतील ३९ विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना बदली ठिकाणी जावे लागणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस बदलीचे आदेश धडकण्याचे संकेत आहे. निवडणूक आयोगाने त्या शासकीय अधिकाऱ्यांना गृह जिल्ह्यात तीन वर्ष पूर्ण झाली आहे व असे अधिकारी निवडणूक प्रक्रिया बाधित करू शकतात, अशा अधिकाऱ्यांना बाहेर काढण्याचा आदेश दिला आहे. मात्र आरोग्य, महसूल, वन विभागात वर्ग १च्या दर्जाची अधिकारी हे आपापल्या गृह जिल्ह्यात ठाण मांडून बसलेले आहेत. अमरावती जिल्ह्यात वन विभागात किमान २५ अधिकारी असे आहेत की, त्यांचा गृह जिल्हा आहे. अनेकांचे राजकीय नेत्यांशि चांगले लागेबांधे आहेत. अधिकारी तर आमदार, मंत्र्यांच्या पत्राने जिल्ह्यात आहेत.