आशाताई बच्छाव
अमरावती जिल्ह्यात कृषी सेवा केंद्राचे १७ परवाने रद्द, १३ निलंबित; कृषी विभागाचे धडक कारवाई, ४ केंद्र चालकांना यश येओ ची तंबी.
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती. सदर प्रकरणात जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी राहुल सातपुते यांच्या समक्ष सुनावणी घेण्यात आली त्यानंतर त्यांच्याद्वारे सदर कार्य करण्यात आली. अनियमीततेसह बियाणीची एमआरपी पेक्षा जास्त दराने विक्री केल्या जात असल्यामुळे अनेक कारणासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी शुक्रवारी धडक कारवाई मोहीम सुरू केली. यामध्ये १७ कृषी सेवा केंद्राचे परवाने रद्द करण्यात आले निलंबित तर४ केंद्र चालकांना ताकीद देण्यात आली आहे. क खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा स्तरावर १ व तालुक्यात १४ पथक गठीत करण्यात आले या पथकाद्वारे सर्व कृषी सेवा केंद्राची तपासणी करण्यात आली. शिवाय जादा दराने बियाणे विक्री करण्यात आले होते. या प्रकरणात गुरुवारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कपाशी बियाणे पाकिटांची दोन पेक्षा जास्त विक्रीसाठी नोंद नसणे, अपडेट नसणे, परवण्यात स्तोत्त नमूद नसताना खत, कृषी निष्ठाता साठा आढळून येणे, केंद्राचे रेकॉर्ड अपडेट नसणे याशिवाय अन्न काढण्यासाठी जून महिन्यातील पहिल्या आठवड्यात कृषी केंद्रावर कारवाई करण्यात येऊन आपले म्हणणे मांडण्याची संधी कृषी केंद्रचालकांना देण्यात आली होती. या प्रकरणात जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी राहुल सातपुते यांच्या समक्ष सुनावणी घेण्यात भातकुली तालुक्यात बियाणे खते व कीटकनाशकाचे प्रत्येकी दोन असे सहा परवाने रद्द करण्यात आले. तर ७ निलंबित करण्यात आले. मोर्शी तालुक्यात बियाण्याचे ९ व दर्यापूर तालुक्यात २ परवाने रद्द करण्यात आले. शिवा दर्यापूर तालुक्यात बियाण्याचे ४ व भातकुली तालुक्यात७, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात २, असे तेरा परवाने निलंबित करण्यात आलेले आहे. अमरावती तालुक्यात २, भातकुली व नांदगाव खंडेश्वर तालुक्यात प्रत्येकी १ अशा ४ कृषी बियाणे केंद्र चालकांना ताकीद देण्यात आलेली आहे.