आशाताई बच्छाव
राष्ट्रधर्म प्रचार समितीच्या सुसंस्कार सुसंस्कार शिबिरात १९० बालकांनी गिरवले आदर्शवादाचे धडे: चित्त थरारक कवायतीचेही सादरीकरण.
दैनिक युवा मराठा.
पी. एन.देशमुख.
अमरावती जिल्हा प्रतिनिधी.
अमरावती (मोझरी)
अमरावती जिल्ह्यातील गुरुकुल मोझरी येथील दास टेकडी लगतच्या राष्ट्रसंत अध्यात्मिक केंद्रात श्री गुरुदेव राष्ट्रधर्म प्रचार समितीच्या वतीने श्री गुरुदेव सर्वगीणी सुसंस्कार निवासी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून सुमारे १९० बालकांनी आदर्शवादाचे धडे गिरवले. या शिबिराचा समारोप अ.भा. श्री गुरुदेव सेवा मंडळाचे आज जीवन प्रचारक, हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांच्या अध्यक्ष खाली झाला. यावेळी शइबइरआथ्य्रआंनई चित्त थरारक प्रात्यक्षिकासह संस्थेच्या प्रांगणात कवायती सादर केल्या. यावेळी दर्यापूरचे आमदार बळवंत भाऊ वानखडे, गो.सि.टोंपे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष भास्कर जाधव टोंपे, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, रामदास सनके, नामदेवराव गव्हाळे महाराज, गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ च्या विद्यार्थी कल्याणच्या संचालक डॉ. राजू बोरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश भाऊ मोरे, संत साहित्य अभ्यासकप्रा.डा. राजेश मिरगे अमर वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचा प्रारंभ सामुदायिक प्रार्थनेने झाला. प्रास्ताविक समितीचे पदाधिकारी तथा अ.भा. श्री गुरुदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ प्रचारक अरुण भाऊ सालोडकर यांनी केले. संचालक श्रीकृष्ण पखाले यांनी तर आभार हे.भ.प. देविदास शृंगारे यांनी मानले. महाराष्ट्र वंदना व जयघोषाने कार्यक्रमाची सांगता झाली. शिबिर प्रमुख ह.भ.प. शिवदास महाराज श्रुंगारे यांच्या मार्गदर्शनात भजन शिक्षक गोपाल सालोडकर श्रीकृष्ण पकाले रवींद्र ढवळे प्रशांत सांगली व्यवस्थापक रवींद्र वानखेडे आदींनी परिश्रम घेतले.या २१ दिवसीय शिबिरात प्राप्त केलेल्या बौद्धिक, व्यायाम व भजन संगीता विविध कलागुणाचे सादरीकरण करून शिवार शिबिरार्थांनी उपस्थितीचे मन जिंकले. यावेळी आचार्य हरिभाऊ वेरुळकर अन्य मान्यवर तसेच शिबिरात त्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यांच्यासह अनेकांनी पालकांनी त्यांचे कौतुक केले.