आशाताई बच्छाव
भंडारा जिल्हा भरोसा कम्युनिटी पोलिसिंग सेलच्या दामिनी पथकाने पोक्सा कायदा जागृतीचे विद्यार्थ्यांची मन जिंकली
संजीव अंभोरे
भंडारा :- जिल्हा भरोसा कम्युनिटी पोलिसिंग सेल च्या दामिणी पथकाद्वारे आयोजित कार्यक्रमात स्थानीय संत शिवराम महाराज उच्च प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या संयुक्तं विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांना पोक्सा कायदा अंतर्गत जनजागृति पर कार्यक्रमात विद्यार्थ्यांची मने जिंकली.
या कार्यक्रमाला मार्गदर्शन करतांना महाराष्ट्र पोलिस हवालदार भैरवी डोंगरे यांनी मुलांच्या मनातील भिती काढतांना विचारले की, पोलिसांना आपण अनेक ठिकाणी जसे की उत्सव, रॅली, हाणामारी, चोरी, मारपीट,भांडण, आणि कधी कधी दुर्घटना स्थळी तसेच विवीध मदतीच्या वेळी बघतोच न मग आपत्तीच्या वेळी जे आपल्या सोबत असतात ते पोलीस आपलेच आहेत की नाही. मात्र आपणमोबाईल वरून गंधे चित्र किंव्हा वाईट विचार बघणे वाईट आहे की नहीं होय ना त्यामुळें आपण मोबाइल बघणं वाईट असल्याचे विद्यार्थ्यांनी मान्य केले.
महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र दुर्गे यांनी 2012 च्या पोक्सा कायद्या अंतर्गत लैंगिक अत्याचारापासून मुलांना सुरक्षीत करण्याच्या दृष्टीने कायद्या विषयी मार्गदर्शन केले. आता या कायद्याने आरोपीला 10 वर्षा पर्यंत सजा किंव्हा आरोपीला फासी सुद्धा दिली जाते पण समाजात अनेक आरोपी असल्या प्रकारच्या आरोपात अडकलेले असल्याचे दिसुन येते म्हणुन पोक्सा कायदयाविषयी जनजागृति करण्यासाठी भंडारा जिल्हा पोलिस अधिक्षक नुरुल हसन आणि अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात भंडारा जिल्हा पोलिसिंग कम्युनिटी सेल दामिनी पथक व्दारा विविध सामजिक जागरूकतापर कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना जागृत करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र दुर्गे, महाराष्ट्र पोलीस हवालदार भैरवी डोंगरे, सौ. दर्शना टेंभुर्णे, अश्विनी बोंदरे,अध्यक्ष स्थानी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अर्चना भोयर, उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक देवचंद चौधरी , शेखर बोरकर,पोलीस विभागाच्या शितल घुगुल, चालक मुमताज शेख, राधिका बांते, पार्बताबाई बिसणे, सौ अल्का हटवार, दारासिंग चव्हाण, रंजना भिवगडे, कुसुम सार्वे, कु. शितल मरकाम , रंजना चाचेरकर, मंगला मेहर, कु. प्राची मेश्राम, सैनपाल वासनिक, गंगाधर भदाडे आदी अतिथी गण उपस्थीत होते. यावेळी मोठया संख्येने विदयार्थी व पालक उपस्थीत होते.