आशाताई बच्छाव
कोळेगाव येथे भैरवनाथ महाराज संस्थानच्या वतीने महिलांना २७५ साड्यांचे वाटप
जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
दिनांक १४/०४/२०२५
भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे आज २७५ महिलांना मोफत साड्या वाटप करण्यात आल्या. कोळेगाव येथील भैरवनाथ महाराज संस्थान परिसरामध्ये स्वयं प्रेरणेने गावातील अनेक महिला सकाळी साफ सफाईचे काम करतात.
शासन देखील स्वच्छतेबाबत मोठ्या प्रमाणत जागृती करते अशा वेळी गावातील महिलांनी स्वतः पुढाकार घेवून हा मंदिर परिसर स्वच्छतेचा उपक्रम अनेक दिवसापासून हाती घेतल्याने इतरांना देखील प्रेरणा मिळत आहे.
यामुळे मंदिर परिसर अगदी स्वच्छ असल्याने पंचक्रोशीतून येणाऱ्या भाविक भक्तांसाठी आनंददायी वातावरण निर्मिती होत आहे. कोळेगाव येथे दरवर्षी भैरवनाथ महाराज यात्रा महोत्सव आयोजित केला जातो. या यात्रामहोत्सवाची सुरुवात आजपासून अखंड हरीनाम सप्ताहाने सुरु होत आहे.
याच दिवसाचे औचित्य साधून अखंड हरिनामाच्या पहिल्या दिवशी कोळेगाव येथे आज भैरवनाथ महाराज संस्थानच्या वतीने महिलांना मोफत साडी वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी रविराज गावंडे, पुंडलिकराव गावंडे, गजानन गावंडे, पंडितराव गावंडे, गुलाबराव सुसर, दगडूबा सुसर, समाधान गावंडे, रामेश्वर गावंडे, विनोद गावंडे, ज्ञानेश्वर गावंडे आदींची उपस्थिती होती. तसेच महिलांनी स्वच्छतेचा उपक्रम राबविला यामुळे त्याच्या कार्यावर संपूर्ण तालुक्यांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.