
आशाताई बच्छाव
जिल्हाप्रमुख अंबेकरांच्या विनंतीनंतर शिवसैनिक म्हसलेकरांचे आंदोलन मागे !
बदनापूर,/जालना (प्रतिनिधी दिलीप बोंडे)-बदनापूर तालुक्यातील शिवसैनिक कारभारी
म्हसलेकर यांनी शेतकर्यांची सटसकट कर्जमुक्ती करण्यात यावी. या प्रमुख
मागणीसह शेतकर्यांच्या अनेक प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी अकोला निकळक
येथे मागील दोन दिवसांपासून विहिरीत बाज सोडून त्यावर बसून उपोषण सुरू
केले होते. आज शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी त्यांची
आंदोलनस्थळी भेट घेऊन केलेल्या विनंतीनंतर लिंबू पाणी घेऊन आंदोलन मागे
घेतले.
यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा उपनिबंधक परमेश्वर वरखडे, शिवसेना (उद्धव
बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संघटक भानुदास घुगे, उपजिल्हाप्रमुख
भगवानराव कदम, सरपंच महादू गीते, यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती
होती. यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर म्हणाले की, कारभारी
म्हलेकर हे शेतकर्यांच्या प्रश्नावर सातत्याने लढत आहेत. आंदोलने करून
त्यावर आवाज उठवत आहेत. त्यांचे हे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. शिवसेना
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे. अशी
सातत्याने भूमिका घेतली. काँग्रेस सरकार असताना बीड जिल्ह्यात त्यांनी
देता की जाता असा नारा देऊन भव्य मोर्चा काढला होता.
देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी
अत्यंत अग्रही भूमिका घेऊन कर्जदार शेतकर्यांसाठी प्रत्येकी दीड लक्ष
रुपयांची कर्जमाफी करून घेतली होती. तर उद्धवजी ठाकरे स्वतः मुख्यमंत्री
झाल्यानंतर दोन लक्ष रुपयांचे कर्ज सरसकट माफ करून शेतकर्यांना दिलासा
दिला होता. मात्र आता केंद्र सरकारने देशातील बड्या उद्योगपतींचे सुमारे
दहा ते बारा लाख कोटींचे कर्ज माफ केले.