
आशाताई बच्छाव
अड्याळ येथे बोधिसत्व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 13 एप्रिल ते 15 एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन
संजीव भांबोरे
भंडारा _भारतरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त वैशाली बौद्ध विहार बाजार पेठ येथे 13 एप्रिल ते 15 एप्रिल 2025 पर्यंत तीन दिवसीय विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. 13 तारखेला सायंकाळी
६ वाजता गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार त्याचप्रमाणे युवा प्रबोधनकार भावेश कोटांगले यांचा संगीतमय समाज प्रबोधनाचा कार्यक्रम सायंकाळी ७ ते ११ आयोजित करण्यात आलेला आहे. 14 एप्रिल 2025 ला वैशाली बुद्ध विहार बाजारपेठ , मैत्रय बुद्ध विहार शहर वार्ड क्रमांक ४,रमाबाई बुद्ध यारो शहर वार्ड क्रमांक ४ , पंचशील बुद्ध विहार सहायता नगर वार्ड क्रमांक १ ,सुबोध बुद्ध विहार बाजारपेठ वार्ड क्रमांक ५ ,, येथून सकाळी ८ वाजता बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे .सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत धम्म रॅली व झाकी चे आयोजन करण्यात आलेले आहे .या रॅलीचे उद्घाटन अड्याळ येथील सरपंच शिवशंकर मुंगाटे करतील. 15 एप्रिल 2025 ला समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन आयोजन करण्यात आलेले असून सायंकाळी६.३० वाजेपासून सामूहिक भोजनाचे आयोजन वैशाली बुद्ध विहार बाजारपेठ येथे करण्यात आलेले आहे. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन जयंती समारोह उत्सव समितीचे अध्यक्ष अशोक वाहने ,सचिव सुधीर उके ,कोषाध्यक्ष मुनीश्वर बोदलकर,उपाध्यक्ष प्रकाश दहिवले,सहसचिव गणेश मेश्राम , सहकोषाध्यक्ष विकास टेंभुर्णे ,सांस्कृतिक विभाग गौतम जनबंधू ,पत्रकार संजीव भांबोरे, पंकज वानखेडे, ग्रामपंचायत सदस्य आशिक अंबादे, ग्रा .प. सदस्य विपिन टेंभुर्णे, तंटामुक्त समिती अध्यक्ष नरेंद्र अंबादे ,यांनी एका पत्रकाद्वारे केलेली आहे.