
आशाताई बच्छाव
आंतरशालेय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन; १० एप्रिल रोजी बक्षीस वितरण सोहळा
जाफराबाद जालना प्रतिनिधी – मुरलीधर डहाके
दिनांक 25/03/2025
माहोरा, ता. जाफराबाद:
आदर्श शिक्षक कै. संपतराव गोविंदराव कासोद यांच्या प्रथम स्मृती प्रित्यर्थ स्वाभिमान सप्ताह अंतर्गत के. एस. के. इंग्लिश स्कूल, माहोरा आणि शरद पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वालसा यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालेय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला.
या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे बक्षीस वितरण सोहळा १० एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजता संपन्न होणार xआहे. या समारंभाला मा. खा. श्री. रावसाहेब पाटील दानवे (केंद्रीय रेल्वे मंत्री, भारत सरकार) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. आ. श्री. संतोष रावसाहेब पाटील दानवे (अध्यक्ष, पंचायत राज समिती, महाराष्ट्र राज्य) असतील.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा. आ. सौ. संजनाताई जाधव (आ. कन्नड विधानसभा), मा. सौ. निर्मलाताई दानवे (सचिव, छत्रपती शिवाजी महाराज राज्यशिष्ट मंडळ, महाराष्ट्र) आणि मा. सौ. आशाताई गंधे (सदस्य, पी. स. द. जालना) यांची उपस्थिती लाभणार आहे.
*स्पर्धांचे स्वरूप व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
स्पर्धांचे आयोजन विविध गटांत करण्यात आले होते.
*वैयक्तिक क्रीडा स्पर्धा (२५ ते २७ मार्च २०२४):*
१०० मीटर धावणे, लांब उडी, संगीत खुर्ची, सामान्य ज्ञान, चित्रकला (निर्मित चित्र), वक्तृत्व स्पर्धा (मराठी व इंग्रजी), हस्तकला व निबंध स्पर्धा.
*सांघिक क्रीडा स्पर्धा (२७ मार्च २०२४):*
खो-खो, कबड्डी.
सांस्कृतिक स्पर्धा (८ एप्रिल २०२४):
वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, सामूहिक नृत्य, गायन स्पर्धा, नाट्य स्पर्धा.
तसेच, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
*विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी सोहळा*
या स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा १० एप्रिल रोजी बक्षीस वितरण सोहळ्यात सन्मान करण्यात येईल. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी के. एस. के. इंग्लिश स्कूल, माहोरा व शरद पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वालसा यांच्या सहकार्याने विशेष प्रयत्न करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्राची आवड वाढावी, तसेच त्यांना त्यांच्या गुणांना वाव मिळावा, या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. हा सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असून, त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा असेल.