आशाताई बच्छाव
पयडी (पेंढरी )येथील सिमेंट रस्ता नालीचे काम निष्कृष्ट दर्जाचे
पेंढरी/गडचिरोली सुरज गुंडमवार ब्युरो चीफ :धानोरा तालुक्यातील पंचायत समिती धानोरा अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत पयडी अंतर्गत कंत्राटदारामार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रस्त्याचे बांधकाम झाले आहे हे काम अतिशय निष्कृष्ट दर्जाचे झाल्याचे नागरिकांमध्ये ओरड आहे. हे काम जयसिंग समरथ नंदलाल देहारी यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम झाले आहे.
काम अंदाजे पत्रकाप्रमाणे झाले नसून निष्कृष्ट दर्जाचे झाले आहे. या कामावर अभियंता हजर राहत नसल्याने कंत्राटदाराने मनमर्जी ने काम केले असे पैडी येथील नागरिकांमध्ये ओरड आहे. या कामासाठी वापरण्यात येणारे साहित्य तसेच अत्यल्प सिमेंट वापरल्याने कामाच्या दर्जा हे निष्कृष्ट असल्याचे दिसून येत आहे….