आशाताई बच्छाव
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या ‘गडचिरोली जिल्हाध्यक्ष’ पदी तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांची नियुक्ती
गडचिरोली सुरज गुंडमवार ब्युरो चीफ
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय ना. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार व प्रांताध्यक्ष खा. सुनील तटकरे साहेब यांच्या मान्यतेने गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या सीनेट सदस्या तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांची राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या ‘गडचिरोली जिल्हाध्यक्ष’ पदी नियुक्ती करण्यात आली आहे.तसे नियुक्तीचे पत्र कु. संध्या उद्दव सोनवणे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी युवती काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश यांनी तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांना पाठवले आहे. व पक्षाच्या वाढीसाठी व पक्षाची सर्व ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यत पोहचविण्यासाठी पक्षाला सहकार्य राहील असा विस्वास व्यक्त केला आहे. सदर नियुक्ती बद्दल गडचिरोली जिल्ह्यातील तमाम राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.)पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून तनुश्रीताई यांचे अभिनंदन होत आहे…