Home गडचिरोली भाजपा गडचिरोली शहराची सदस्यता नोंदणी व बुथ रचनेची आढावा बैठक

भाजपा गडचिरोली शहराची सदस्यता नोंदणी व बुथ रचनेची आढावा बैठक

38
0

आशाताई बच्छाव

1001338145.jpg

भाजपा गडचिरोली शहराची सदस्यता नोंदणी व बुथ रचनेची आढावा बैठक

गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ:

भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराची सदस्यता नोंदणी व बुथ रचनेची आढावा बैठक इंदिरा गांधी चौकातील शासकीय विश्रामगृहात पार पडली.
या बैठकीत पक्षबांधणीच्या दृष्टीने व बुथ रचना, संघटन व सदस्य नोंदणी याविषयी महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे होते. बैठकिला माजी खासदार तथा आदिवासी मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते, माजी आमदार तथा भाजपा नेते डॉ. नामदेवराव उसेंडी, लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा गीताताई हिंगे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिलजी पोहनकर, जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे, माजी नप उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा कविता उरकुडे, जिल्हा सचिव वर्षां शेडमाके,वर्षां कन्नाके, विवेक बैस नरेश हजारे, विजय उराडे, उपस्थित होते.

या बैठकीत सदस्यता नोंदणी आणि बुथ रचना प्रक्रियेला गती देण्यासाठी रणनीती आखण्यात आली. भाजपाच्या संघटनात्मक बळकटीसाठी सर्व स्तरांवर अधिक प्रभावी कार्य करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. बैठकीला भाजपचे शहर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Previous articleअहिल्यानगरमधील तृतीयपंथींचा भाजपमध्ये प्रवेश
Next articleराष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या ‘गडचिरोली जिल्हाध्यक्ष’ पदी तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांची नियुक्ती
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here