Home जालना शेतकऱ्याचे सोयाबीन,हरभरा,गहू,तुरी,ज्वारी चोरी करणाऱ्या टोळीकडून 10,77,000/- रुपये किंमती मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे...

शेतकऱ्याचे सोयाबीन,हरभरा,गहू,तुरी,ज्वारी चोरी करणाऱ्या टोळीकडून 10,77,000/- रुपये किंमती मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

125
0

आशाताई बच्छाव

1001338130.jpg

शेतकऱ्याचे
सोयाबीन,हरभरा,गहू,तुरी,ज्वारी चोरी करणाऱ्या टोळीकडून 10,77,000/- रुपये किंमती मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जाफराबाद जालना प्रतिनीधी- मुरलीधर डहाके
दिनांक 20/03/2025
सविस्तर वृत्त असे की जालना जिल्ह्यात शेती माल ज्यात प्रामुख्याने सोयाबीन, हरभरा,गहू,तूरी या धान्य पिकांचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत मा.श्री अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक जालना यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव व पथकास सूचना दिल्या होत्या.
त्यावरून पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव स्थानिक गुन्हे शाखा जालना यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करून कार्यवाही करण्याबाबत मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने दिनांक 19/03/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा येथील पथक धान्य पिकाची चोरी करणारे गुन्हेगारांबाबत माहिती घेत असताना त्यांना वक्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषण आधारे माहिती मिळाली की पोलीस ठाणे जाफराबाद हद्दीत मौजे म्हसरूळ शिवारात जाफराबाद ते माहोरा रोडवरील पत्राचे गोडाऊन येथील सोयाबीन चोरी बळीराम रावसाहेब फुके रा.उंमरखेडा तालुका भोकरदन याने त्याचे साथीदारासह केल्याची खात्रिलायक माहिती मिळाली.
त्यावरून सदर पथकाने बळीराम रावसाहेब फुके वय 23 वर्ष राहणार उंमरखेडा तालुका भोकरदन याचा शोध घेऊन त्यास दिनांक 19/ 03/2025 रोजी मौजे सोयगाव येथून ताब्यात घेतले त्यास गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करता त्याने त्याचे साथीदार 2) संदिप गणेश वाघमारे वय 32 वर्षे रा. उंमरखेडा भोई ता. देऊळगाव राजा 3) आनंद उत्तम मोरे वय 32 वर्ष रा.आखणी ता. मंठा 4) प्रकाश राजू झिने वय 22 वर्षे रा. लोनगाव व त्यांचे तीन फरार साथीदार पोलीस ठाणे जाफराबाद, मंठा, भोकरदन ,बदनापूर, मौजपुरी च्या हाद्दित वेगवेगळ्या गावात सोयाबीन हरभरा गहू ज्वारी चे धान्याचे कट्टे चोरी केल्याचे सांगून 08 गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपी 1) बळीराम रावसाहेब फुके 2) संदीप गणेश वाघमारे वय 32 वर्ष रा. सावखेडा भोई तालुका देऊळगाव राजा 3) आनंद उत्तम मोरे वय 32वर्षे रा. आखणी ता. मंठा 4) प्रकाश राजु झीने वय 22 वर्षे रा. लोनगाव त्यांच्याकडून खालील प्रमाणे गून्हे उघडकीस आले आहे.
अ.क्र.1) पोस्टे जाफराबाद गुरनं 242/2024(1)305(A) भान्यास – जप्त मुद्देमाल 1,48000/- रूपये किंमती 74 कट्टे सोयाबीन,4,50,000/- रु. किंमती महिंद्रा पीकअप MH 21 BH 6189
अ.क्र.2) पोस्ट जाफराबाद गुरनं 205/2024 कलम 334(1)305(a) भान्यास – जप्त मुद्देमाल 3000/- रु. किंमती 5 कट्टे गहू
अ.क्र.3) पोस्टे भोकरदन गुरनं 287/24 334(1)305(a) भान्यास – मुद्देमाल जप्त – 36000/- रु.18 कट्टे सोयाबीन,5000/- रुपये किंमती 1 कट्टा हरबरा
अ.क्र.4)पोस्टे बदनापूर गुरनं 467/2024 कलम 303(2)305 भान्यास – 20,000/- रुपये किमती 10 सोयाबीनअ.क्र.5) पोस्टे मौजपूरी गुरनं 39/2025 कलम 303(2) भान्यास जप्त मुद्देमाल 21,000/- रुपये किंमती 6 कट्टे हरबरा 3,00,000/- रु. किंमती स्विप्ट कार MH 12 PQ 9535
अ.क्र.6) पोस्टे मौजपुरी गुरनं 146/2024 कलम 379 भादंवी जप्त मुद्देमाल- 10,000/- कि.05 कट्टे सोयाबीन,65,000/- रु. कि.5 कट्टे गहू.2500रु.कि.3 कट्टे ज्वारी एकूण 19,000/-
अ.क्र.7) पोस्टे मौजपुरी गुरनं 201/2024 भादंवी जप्त मुद्देमाल 5000/- रु. कि.02 कट्टे हरबरा
अ.क्र.8) पोस्टे मंठा 117/2025 कलम 334(1) जप्त मुद्देमाल 50,000/- रु. कि.20कट्टे तूर
असा एकुण 10,77,000/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.आरोपींना पाढील गुन्ह्याचे तपास कामी पोलीस ठाणे जाफराबाद व पोलीस ठाणे मौजपुरी यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदर ची कार्यवाई ही मा. श्री अजय कुमार बंसल साहेब (भापोसे) पोलीस अधीक्षक जालना, मा. श्री आयुष नोपाणी (भापोसे) अप्पर पोलीस अधीक्षक जालना यांचे मार्गदर्शनाखाली श्री पंकज जाधव, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना. श्री. योगेश उबाळे, सहा.पो. निरीक्षक श्री राजेन्द्र वाघ, पोउपनी. पोहवा सम्युअल कांबळे, प्रशांत लोखंडे, विजय डीक्कर, धीरज भोसले, योगेश सहाने, सोपान क्षीरसागर, सागर बाविस्कर, रमेश राठोड, कैलास खार्डे, सतिश श्रीवास, रमेश काळे, इरशाद पटेल, भाऊराव गायके, आक्रूर धांडगे, कैलास चेके, सौरभ मुळे, गणपत पवार सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना केली .

Previous articleआलेबेदर येथील बौद्ध धम्म परिषदेत बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या ठराव मंजूर
Next articleअहिल्यानगरमधील तृतीयपंथींचा भाजपमध्ये प्रवेश
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here