आशाताई बच्छाव
आलेबेदर येथील बौद्ध धम्म परिषदेत
बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या ठराव मंजूर
संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी)_साकोली जवळ असलेल्या भदंत प्रज्ञाज्योती बहुउद्देशीय संस्था अंतर्गत त्रिरत्न बुद्ध विहार येथे आलेवेदर येथे बौद्ध धम्म परिषद घेण्यात आली.
या ठिकाणी बोधगया येतील महाबोधी
महाविहार हा हिंदूंच्या ताब्यात आहे तिथे चार बौद्ध व चार हिंदू व तेथील कलेक्टर हा एक सदस्य हिंदूच असतो म्हणजे हिंदूचे पाच आणि बुद्धांचे चार अशी सदस्य संख्या असल्यामुळे नेहमीच हिंदूंच्या बहुमत असतो
बोधगया येथील महाबोधि विहार हिंदूंच्या ताब्यात असतो .महाबोधी विहार हा जगातील बौद्धांचा श्रद्धास्थान आहे .तो महाबोधी विहार हिंदूंच्या ताब्यात आहे .तो बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावा याकरता ठराव घेण्यात आला.
या बौद्ध धम्म परिषदेमध्ये बिहार राज्यातील बोधगया येथील महाबोधी महाविहार
बौद्धांच्या ताब्यात द्या हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला .याप्रसंगी 35 हजार लोक या ठिकाणी उपस्थित होते .
हा ठराव सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्राम यांनी मांडला तर त्याला अनुमोदन म्हणून भंते नागसेन , भंते आनंद , श्रामनेर नागरत्न , संस्थेचे सचिव रोशन भोवते, सभापती शीतल राऊत,सामाजिक कार्यकर्ते कार्यकर्ते
अचल मेश्राम, दिपक मेश्राम,पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डी जी रंगारी, प्रबोधनकार मनोज कोटांगले ,भावेश कोटांगले, शिवकुमार वैद्य, दादू बडोले, बिट्टू गजभिये,
नितीन रामटेके ,साधना रामटेके, वसंत रामटेके रवी देशभ्रतार देवदास रामटेके, भरपूर मान्यवर मंडळी व बौद्ध उपासक या प्रसंगी उपस्थित होते .