आशाताई बच्छाव
अवघ्या चोवीस तासात केळवद घरफोडीतील आरोपीच्या मुसक्या आवळल्या चिखली पोलिसांची धडाकेबाज कारवाई…..
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-चिखली चिखली तालुक्यातील केळवद येथील राजेंद्र बाबुराव पाटील वय ५७ वर्ष, धंदा शेती, रा. केळवद ता. चिखली जिल्हा बुलढाणा समक्ष पोलीस स्टेशन चिखली येथे हजर येवुन रिपोर्ट दिला की, दिनांक ०७/०३/२०२५ रोजी फिर्यादी हे त्यांचे परीवारासह बाहेर गावी लाखनवाडा येथे व वा सुमारास केळवद येथे आले असता त्यांना त्यांचे घराचे दरवाजाचे कुलुप तुटलेले दिसले त्यावेळी त्यांनी घराचे दार उघडुन घरात जावनु पाहणी केली असता त्यांना बेडरूम मधील लोखंडी कपाटाचे लॉक तुटलेले व कपाटाची तिजोरी उघडी दिसुन आली. फिर्यादी यांनी तीजोरीची
पाहणी केली असता तिजोरी मध्ये ठेवलेले १) सोन्याची चैन व त्यांमध्ये एकसोन्याचा ओम वजनी अंदाजे १९ ग्रॅम९९० मिली किंमत अंदाजे १,६२६०० रूपये २) एकसोन्याची फॅन्सी चैन वजनी अंदाजे ७ग्रॅम ३०० मिली किमत अंदाजे ४९७०० रूपये ३) सोन्याची अंगठी वजनी अंदाजे ७ ग्रॅम ४१० मिली किंमत अंदाजे ५०७००/- रूपये ४) सोन्याचे ओम दोन नग वजनी अंदाजे ५७० मिली किंमत अंदाजे ३९००/- रूपये ५) लहान मुलाचीसोन्याची अंगठी दोन नग वजनी अंदाजे ८१० मिली ग्रॅम किंमत अंदाजे ५६००/ रूपये असा एकुण २,७२,५००/-रु. एकुण सोन्याचे दागिने ३६ ग्रॅम ८० मिली एकुण किंमत २,७२,५००/- रूपये चा मुददेमाल दिसुन आला नाही वरुन फिर्यादी यांचे तोंडी रिपोर्ट वरून अप सदरचा दाखल करून तपासात घेतला असता.
सदर गुन्हयाचे संबंधाने मा पो.नि. संग्राम पाटील सा यांनी पोलीस स्टेशनचे डि.बी. पथक यांना गुन्हयासंदर्भाने सखोल तपास करणे व आरोपी शोधकामी सुचना देण्यात आल्या असता डि.बी. पथकाचे सफौ राजेंद्र काळे, निलेश सावळे, अजय इटावा यांना गोपनीय माहिती मिळाली की, गुन्हयातील आरोपी हा अण्णा भाऊ साठे चौक येथे येणार असल्याने तेथे सापळा रचुन थांबले असता आरोपी सुरज प्रमोद मोरे हा अण्णा भाऊ साठे चौक मधुन जाताना दिसुन आला वरून त्यास थांबवुन नाव गाव विचारले असता त्याने त्यांचे नाव सुरज प्रमोद मोरे असे सांगितले त्याला त्याचा साथिदार विजय गवई बाबत विचारपुस केली असता तो घरा समोर असल्या बाबत सांगितले वरून पो. स्टॉपच्या मदतीने सापळा रचुन विजय महादु गवई यास ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणुन आरोपीस विश्वासात घेवुन विचारपुस केली असता सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांनी चोरी केलेले दागिने ३६ ग्रॅम ८० मिली वजनाचे एकुण किंमती २,७२,५००/-रूपये चा मुददेमाल त्यांचे ताब्यातुन हस्तगत करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक बि.बि. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार पो. नि. संग्राम पाटील, डि.बी. पथकाचे परि. पोउपनि समाधान वडने, स. फौ राजेंद्र काळे ब.न. ९०२ पोना अमोल गवई ब नं २२६१, पंढरीनाथ मिसाळ ब न १२१६, प्रशांत धंदर ब नं ५८१, सागर कोल्हे ब नं २५३९, निलेश सावळे ब न १३४७, अजय इटावा ब न ४५४, राहुल पायघन ब न२५७०मपोकॉ रुपाली उगले ब नं२४१८ यांनी केली आहे.