आशाताई बच्छाव
अप्पर पोलीस अधीक्षकांचे धडक छापे, पण जळगाव जामोद पोलीस गप्प का?
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा ::-जळगाव जामोद तालुक्यातील
अवैध गुटखा व्यापारावर कारवाई करण्यासाठी
अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. श्रनिक लोढा यांच्या पथकाने मोठी कारवाई करत ३४.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र, स्थानिक जळगाव जामोद पोलिसांनी याआधी कारवाई का केली नाही? हा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. पथकाने सुनगाव येथे नाकाबंदी करत बोलेरो पिकअप (MH 30 BD 5546) अडवले. त्यातून कोट्यवधींच्या गुटख्याचा साठा सापडला. आरोपी शुभम भउटे, राहुल जयस्वाल आणि प्रवीण मुर्खे यांना अटक झाली असून, त्यांच्याविरोधात कठोर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाने फिर्याद दिल्यानंतरच पोलिसांनी गुन्हा दाखल केला, यावरून स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अप्पर पोलीस अधीक्षकांच्या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. मात्र, जळगाव जामोद पोलीस या गुटखा तस्करीकडे दुर्लक्ष करत होते का? त्यांनी यापूर्वी अशा टोळ्यांविरोधात कठोर कारवाई का केली नाही? हे प्रश्न जनतेतून विचारले जात आहेत.