आशाताई बच्छाव
शेलोडी प्रकरणातील मृतदेह पोलीस स्टेशन आवारात आणणे भोवले!; पंधरा ते वीस जणांविरुद्ध खामगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा:-खामगाव तालुक्यातील शेलोडी येथे ३ मार्च रोजी बाप-लेकावर चाकू हल्ला करण्यात आला जुन्या वादातून शेलोडी येथे ३ मार्च रोजी दोन कुटुंबामध्ये जोरदार वाद झाला होता. यामध्ये चाकू चालला. या हल्ल्यात रघुनाथ गाडे व त्यांचा मुलगा गोपाल गाडे हे दोघे गंभीर जखमी झाले होते. ४ मार्च रोजी रघुनाथ गाडे यांच्यावर उपचार सुरू असताना अकोला येथे रुग्णालयात त्यांचा दुर्दैवी मृ झाला. नातेवाईक, गावकऱ्यांनी रघुनाथ गाडे यांचा मृतदेह थेट स्मशानभूमीत न नेता खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या आवारात आणून पोलिसांवर रोष व्यक्त केला. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी मृतदेहाची अवहेलना केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नापोकॉ बाळकृष्ण फुंडकर यांच्या तक्रारीवरून एकनाथ जगन्नाथ गाडे, दीपक काशिनाथ गाडे, संतोष येवले, मनोहर विश्वनाथ गाडे, दीपक काशिनाथ गाडे, अनंता वसंता बानाईत, नागेश समाधान गाडे यांच्यासह इतर १५ ते २० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.