Home बुलढाणा EXCLUSIVE बापरे! जोरदार धडकेत दुचाक्या उडाल्या! – चैतन्यवाडीतील क्लासेस परिसरात विद्यार्थ्यांच्या दुचाकींची...

EXCLUSIVE बापरे! जोरदार धडकेत दुचाक्या उडाल्या! – चैतन्यवाडीतील क्लासेस परिसरात विद्यार्थ्यांच्या दुचाकींची सर्कस !

29
0

आशाताई बच्छाव

1001308386.jpg

EXCLUSIVE बापरे! जोरदार धडकेत दुचाक्या उडाल्या! – चैतन्यवाडीतील क्लासेस परिसरात विद्यार्थ्यांच्या दुचाकींची सर्कस !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :– बुलडाणा चैतन्य वाडीतील क्लासेस परिसरात भीषण अपघात झाल्याचा व्हिडिओ समोर आलाय. दोन दुचाकीस्वरांची झालेली जोरदार धडक आणि दोघेही वाहना सोबत उडत गेल्याचे चित्र काळजाची धडधड वाढवणारे आहे. येथे अनेक अपघात झाले असून, विद्यार्थ्यांच्या सुसाट वाहनांना ब्रेक लागलेला नाही.
चैतन्यवाडीत पारडेज क्लासेस, सूर्यवंशी क्लासेस श्री भुतडा यांच्या घरासमोर सदर अपघात
झाला. या परिसरात टोलेजंग फी घेऊन अवैधपणे क्लासेस घेतले जातात. क्लासचे संचालक नियमांचे पालन करीत नाहीत. विद्यार्थी गल्लीबोळातून सर्कस करीत वाहने दमटवितात. ‘नजर हटी दुर्घटना घटी’ असे अनेकदा होत असल्यामुळे येथील अपघाताचे प्रमाण दिवसागणिक बळावत आहे. संभाव्य अपघात कोण रोखणार ?
टवाळखोर विद्यार्थ्यांच्या या सुसाट वाहनांना ब्रेक लावण्याची जबाबदारी कोण घेणार? हा प्रश्न परिसरातील नागरिक विचारत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here