आशाताई बच्छाव
त्याग,प्रेम, कणखरपणा आणि प्रेरणा म्हणजे स्त्री:-डॉ.मिनल भुरे स्त्रीरोग तज्ज्ञ
( शारदा विद्यालयात जागतिक महिला दिनी प्रतिपादन )
संजीव भांबोरे
भंडारा ( जिल्हा प्रतिनिधी)स्त्री म्हणजे त्याग,प्रेम कणखरपना आणि प्रेरणा आहे. ती एक आई आहे, जी संपूर्ण आयुष्यभर आपल्या मुलांसाठी झटते .ती एक बहिण आहे ,जी कायम आपल्या भावाच्या पाठीशी उभी असते.ती एक पत्नी आहे. जिला आपल्या जोडीदाराचा सुखदुःखाची चिंताअसते आणि ती एक मुलगी आहे जिला कुटुंबासाठी काही करण्याची जिद्द असते. स्त्रिया नसते तर आपले जीवन अपूर्ण राहिले असते. विद्यार्थ्यांनो तुम्हीं तुमच्या जीवनाचे शिल्पकार व्हा.विचाराला कृतीची साथ दया.देशातील महानायिकांचे आदर्श घ्या.असे प्रतिपादन सुप्रसिध्द डॉ.मिनल भुरे स्त्रीरोग तज्ज्ञ यांनी केले.त्या स्थानिक पूजा शिक्षण संस्था द्वारा संचालित शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय तुमसर येथे आयोजित ” जागतिक महिला दिन ” कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य राहुल डोंगरे होते.तर विशेष अतिथी म्हणून डॉ.संजय भुरे बालरोग तज्ज्ञ, प्रमुख वक्त्या म्हणून डॉ.मिनल भुरे स्त्रीरोग तज्ज्ञ हे होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता,राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले, पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर, रमाई आंबेडकर,मदर तेरेसा, प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.सत्कारमूर्ती डॉ.मिनल भुरे,डॉ. संजय भुरे, शिक्षिका वृंद नितुवर्षा मुकुर्णे,प्रीती भोयर, विद्या मस्के, सुकांक्षा भुरे,बेनिता रंगारी,आरती पोटभरे,पुनम बालपांडे तर शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद झणकेश्वरी सोनेवाणे, उषा दाते, कल्पना मानकर,बंदिनी खैरकर,विद्या देशमुख आदी सत्कार मूर्तींचा शाल, श्रीफळ, ग्रंथभेट,पेन, रोपटं देवून सत्कार प्राचार्य राहुल डोंगरे यांनी केला.आजचा दिवस जितका महिलांसाठी खास आहे,तितकाच तो संपूर्ण मानव समाजासाठीही खास आहे.कारण स्त्री एक मार्गदर्शक , समर्थक, प्रेरणादायी व्यक्ती आहे.आजच्या काळात स्त्रिया कुटुंब सांभाळण्यासोबतच शिक्षण, व्यवसाय,संशोधन,प्रशासनासोबतच समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीतही मोलाची भूमिका बजावत आहेत.त्यामुळे आजचा दिवस केवळ त्यांचा सन्मान करण्याचा नाही,तर त्यांच्या योगदानाची जाणीव ठेवण्याचा आहे. घरांना आणि आयुष्याला स्वर्ग बनविण्याचे काम स्त्रिया करतात.त्यांच्या कर्तृत्वाला आम्हीं सॅल्युट करतो.असे प्रांजळ मत डॉ.संजय भुरे बालरोग तज्ज्ञ आणि प्राचार्य राहुल डोंगरे यांनी प्रतिपादन केले.यावेळी विद्यार्थ्यांनी विविध महानायिकांच्या वेशभूषेत येऊन विचार प्रगट केले.काही विद्यार्थ्यांनी नृत्यातून पुरोगामी विचारांचा गजर केला.पूजा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महाबीरप्रसाद आग्रवाल आणि सचिव रामकुमार आग्रवाल यांचे विशेष मार्गदर्शनातून कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. संचालन सक्षम गायधने यांनी केले तर आभार प्रदर्शन नेत्रा मेश्राम यांनी केले.आयुष्यातील सर्वश्रेष्ठ सन्मान म्हणजे ” भारताचे संविधान” असल्याचं प्रमुख वक्त्या डॉ.मिनल भुरे स्त्रीरोग तज्ज्ञ यांनी आवर्जून व्यक्त केले…हे विशेष! कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक गडपायले,श्रीराम शेंडे,संजय बावनकर,अशोक खंगार, रुपराम हरडे,अतुल भिवगडे, अंकलेश तिजारे, लक्ष्मीनारायण मोहनकर,दीपक बालपांडे यांनी सहकार्य केले.