आशाताई बच्छाव
शिवम हॉटेल भंडारा येथे महिला दिनी महिलांचा सत्कार
महिला अधिकार सामाजिक संघटनेचा पुढाकार
संजीव भांबोरे
भंडारा(जिल्हा प्रतिनिधी )जागतिक महिला दिनानिमित्त महिला अधिकार सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य च्या वतीने भंडारा येथील शिवम हॉटेल येथे दिनांक 8 मार्च 2025 ला महिला दिनाचे औचित्य साधून विविध महिलांचा संघटनेचे संस्थापक सदानंद धारगावे व संघटनेचे अध्यक्षा नम्रता बागडे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ, देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शशिकांत भोयर होते. तर उद्घाटक म्हणून संघटनेचे संस्थापक सदानंद धारगावे उपस्थित होते .प्रमुख अतिथी म्हणून नम्रताताई बागडे अध्यक्षा महिला अधिकार सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य ,पोलीस शिपाई दुर्गा मुरकुटे ,प्रांजलीताई पडोळे, शशिकांत भोयर, शितल गेडाम , जयश्री बोरकर ,स्नेहा घोडीचोर, कल्याणी तिरपुडे , मुख्याध्यापिका मोटघरे ,कांचनमालाताई माकडे,मनीषा भांडारकर, भावना शेंडे, निकिता गजभिये शिल्पा चव्हाण सपना बोरकर, भारती कांबळे,माया जांभुळकर ,शोभना सरोजकर, प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी संघटनेचे संस्थापक सदानंद धारगावे यांनी सांगितले की ,सदर संघटना मध्प्रदेश व छत्तीसगड राज्यांमध्ये कार्यरत असून या कार्यक्रमाला आवर्जून पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत ही एक गर्वाची गोष्ट आहे.डॉ. नाकाडे मॅडम प्रांजली पडोळे मॅडम, जयश्री बोरकर, डॉ. स्नेहल घोडीचोर, कल्याणी तिरपुडे, सदानंद धारगावे, शशिकांत भोयर, यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन मृणाली दहिवले यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक नम्रता बागडे आभार वैशाली वालदे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सीमा काळे, वैशाली वालदे, ज्योती मलोडे, सारिका नागदेवे, स्मिता मरगडे, सीमा सुखदेवे, वर्षा पाटील ,रश्मी मारवडकर, शितल धकाते, मनीषा नागदेवे, रंजना वैद्य ,अस्मिता नगरारे, अनुजा नागदेवे, माया जांभुळकर,मृणाली रामटेके, आचार्य पांडुरंग नंदागवळी, पोर्णिमा खांडेकर, व यावेळी मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्याचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.