आशाताई बच्छाव
समाजातील कष्टकरी महिलांचा सन्मान करणे हीच खरी महिला दिनाची जाणीव – अॅड. मनोज संकाये
महिला दिनानिमित्त परळी नगरपालिका स्वच्छता कर्मचारी महिलांचा सन्मान
मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा
बीड/परळी दि.०८ मार्च २०२५
“समाजातील कष्टकरी महिलांचा सन्मान करणे हीच खरी महिला दिनाची खरी जाणीव आहे,” असे प्रतिपादन विधीज्ञ ॲड. मनोज संकाये यांनी केले. आज शनिवार दि. ०८ मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून अॅड. मनोज संकाये मित्र मंडळाच्या वतीने परळी नगरपालिकेतील स्वच्छता कर्मचारी महिलांचा सन्मान करण्यात आला. वल्लभ नगर येथील ॲड. संकाये यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात कष्टकरी महिलांना साडी, पुष्पगुच्छ व अल्पोपहार देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित महिला कांताबाई जगतकर, लक्ष्मी डोंगरे, लक्ष्मी हजारे ,आशाबाई कांबळे ,आशा आदोडे, छाया पैठणी ,संगीता पाढमूखे, यावेळी महिलांनी आनंद व्यक्त केला. या वेळी नगरपरिषद स्वच्छत सुपरवायझर दगडू मस्के, प्रकाश सीताप, हनुमान झोडगे, जगन्नाथ सरवदे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून स्वच्छता कर्मचारी महिलांच्या अथक परिश्रमांचे कौतुक केले. तसेच मित्र मंडळाचे पदाधिकारी अनिल चौधरी, प्रवीण रोडे, संदीप चौधरी, संतोष कांबळे, देविदास मुंडे यांनीही आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली. या उपक्रमाच्या माध्यमातून महिला सन्मान आणि त्यांचे योगदान अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने उचललेले हे पाऊल समाजाला प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.