Home बुलढाणा धक्कादायक..! तिला दोनदा जाळून टाकण्याचा प्रयत्न ! मुलगा झाला नाही म्हणून चिमुकलीला...

धक्कादायक..! तिला दोनदा जाळून टाकण्याचा प्रयत्न ! मुलगा झाला नाही म्हणून चिमुकलीला विहिरीत टाकण्याचा प्रयत्न.! म्हणे, पोलिस माझं काहीच वाकड करत नाही…!-

28
0

आशाताई बच्छाव

1001286616.jpg

धक्कादायक..! तिला दोनदा जाळून टाकण्याचा प्रयत्न ! मुलगा झाला नाही म्हणून चिमुकलीला विहिरीत टाकण्याचा प्रयत्न.! म्हणे, पोलिस माझं काहीच वाकड करत नाही…!-
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- जळगाव जामोद एकीकडे देशाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजर केला असला तरी देशातील शेकडो समस्या जैसे थे आहेत.. एकीकडे
स्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारल्या जातात मात्र दुसरीकडे महिलांवर सातत्याने अत्याचारात वाढ होते आहे.. कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. तिचे स्वातंत्र्य अद्यापही काही नराधमांना मान्य होतच नाही.. जळगाव जामोद तालुक्यातील एक.
विवाहितेचा अत्यंत क्रूर पद्धतीने छळ करण्यात आला.. पहिली मुलगी झाली म्हणून विवाहितेला दोनदा जाळून मारण्याचा प्रयत्न झाला.. त्यातून ती वाचल्यावर नराधमांची नजर तिच्या चिमुकलीवर गेली, बिचाऱ्या निरागस चिमुकलीला देखील विहिरीत फेकून देण्याचा प्रयत्न करण्यात आला… अंगावर काटा आणणारी ही छळ कहाणी विवाहितेने पोलिसांना ऐकवली आहे.. पोलिसांनी जळगाव जामोद तालुक्यातील मोहिदपूर येथील साजन बाबाजान सोळंके, बाबाजान देवराम सोळंके, सताबाई बाबाराव सोळंके, देवराम नाना सोळंके अशा चौघाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ममता साजन सोळंके (२०) या विवाहितेने या प्रकरणाची तक्रार दिली आहे. २०२१ मध्ये मोहिदपूरच्या साजन सोळंके याच्याशी तिचे लग्न झाले. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस सासरच्या लोकांनी तिला चांगले वागवले मात्र
त्यानंतर घरातील लहान सहान कारणावरून सासू सासरे व पती मानसिक त्रास देत होते असे तक्रारीत म्हटले आहे. पतीला व सासऱ्याला दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेत असताना एके दिवशी पती आणि सासऱ्याने तिला धरून ठेवले, सासूने पोटावर लाथा मारल्या यामुळे तिचा गर्भपात झाला. विवाहितेचा पती साजन हा विवाहितेचे मजुरीचे पैसे घेऊन दारू पिऊन येतो, घरात कोणतेही स्वयंपाकाचे सामान आणत नाही. याबद्दल विवाहितेने नवऱ्याला म्हटले असते त्याने व सासूने विवाहितेला दोन वेळा जाळून जीवाने मारण्याचा प्रयत्न केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here