Home कोल्हापूर सिद्धगिरी हॉस्पिटल अत्याधुनिक न्युरो मायक्रोस्कोप गरीब रुग्णांच्यासाठी वरदान ठरेल : मा.ना. प्रकाश...

सिद्धगिरी हॉस्पिटल अत्याधुनिक न्युरो मायक्रोस्कोप गरीब रुग्णांच्यासाठी वरदान ठरेल : मा.ना. प्रकाश आबीटकर

19
0

आशाताई बच्छाव

1001275295.jpg

 

सिद्धगिरी हॉस्पिटल अत्याधुनिक न्युरो मायक्रोस्कोप गरीब रुग्णांच्यासाठी वरदान ठरेल : मा.ना. प्रकाश आबीटकर
आरोग्य मंत्री आबीटकर यांच्या हस्ते लोकार्पण !     कोल्हापूर अविनाश शेलार ब्युरो चीफ 

सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, कणेरी येथील न्युरोसर्जरी विभागाने अत्यंत जटील, जोखमीच्या व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया ग्रामीण भागात करून आज पर्यंत अनेक विक्रम नोंदवले आहेत. अशा जटील शस्त्रक्रिया करण्यासाठी आता अत्याधुनिक न्युरो मायक्रोस्कोप भारतात प्रथमच सिद्धगिरी हॉस्पिटल येथे दाखल झाला आहे. न्युरो मायक्रोस्कोपचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री माननीय श्री प्रकाशराव आबिटकर यांच्या शुभहस्ते झाले महाशिवरात्रीच्या पावन पर्वदिनी परमपूज्य श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या पावन सानिध्यात सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे हा सोहळा पार पडला , या प्रसंगी बोलताना आरोग्यमंत्री बोलत होते.

यावेळी बोलताना मा. मंत्री महोदय पुढे म्हणाले, “पूर्वी मठावर शिवरात्रीला दर्शनाला आजूबाजूचे भाविक यायचे पण आता देशभरातून लाखो लोकांची पाऊले मठाकडे वळत आहेत. परमपूज्य स्वामीजींचे कार्य देशभरात विस्तारलेले आहे, याचा प्रत्यय आम्हाला वेळोवेळी येतो. अध्यात्माला सामाजिक कार्याची जोड दिल्यामुळे मठ सामाजिक कार्यासाठी अधिक ओळखला जातो. स्वामीजींच्या सारख्या कर्मयोगी संतांचे मार्गदर्शन आम्हाला लाभले तर कोल्हापूरचे नव्हे तर राज्यभरात कार्याचा आदर्श घालून देता येईल. स्वामीजींच्या सामाजिक कार्यात आम्हाला सहभागी होऊन सेवा करण्याची ग्वाही यावेळी मी व्यक्त करतो.”

यावेळी बोलताना सिद्धगिरी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. शिवशंकर मरजक्के म्हणाले, “ रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा या मूल्यांवर गेली १५ वर्षाच्या सिद्धगिरी हॉस्पिटलची वाटचाल सुरु असून धर्मादाय श्रेणीतील रुग्णालयांमध्ये मुंबई ते बेंगलोर दरम्यान सर्व सोयीसुविधा एकाच छताखाली रुग्णांना उपलब्ध करून देणारे हे प्रमुख हॉस्पिटल आहे आणि आता जे ZEISS PENTERO 800 S या उपकरणाचे भारतातील पहिली स्थापना कणेरी सारख्या एका ग्रामीण धर्मादाय रुग्णालयात होत असल्याचा आनंद आहे. या उपकरणामुळे कमी वेळात आणि सहजपणे मेंदूवरील शस्त्रक्रिया करणे सोपे होणार आहे. अंदाजे साडेतीन कोटी रुपये किमतीच्या या मायक्रोस्कोप मध्ये ऑपरेटिंग सर्जन आणि त्यांचे सहाय्यक यांना एकाच वेळी मायक्रोस्कोप पाहणे शक्य होणार आहे. इतकी अत्याधुनिक प्रणाली रुग्णांना कोणत्याही अतिरिक्त शुल्क न आकारता सिद्धगिरी हॉस्पिटल येथे निरो विभागात उपलब्ध होत आहे. या प्रणाली सोबतच न्यूरो नेवीगेशन सिस्टम, न्यूरो NIM – 3, न्यूरो मॉनिटरिंग सिस्टीम CUSA DRIL आणि अत्याधुनिक न्यूरो Anastheshia मशीन यांनी सिद्धगिरी हॉस्पिटल येथील न्यूरो शस्त्रक्रिया विभाग सुसज्ज आहे यासोबतच पूर्णवेळ न्यूरो भूलतज्ञ, न्यूरो पॅथॉलॉजिस्ट, CT, MRI स्वतंत्र न्यूरो आय सी यु या सुविधांमुळे सिद्धगिरी येथील न्यूरो विभाग राष्ट्रीय स्तरावर नावा रूपास येत आहे. या सुविधा ना नफा ना तोटा या तत्त्वावरती वाजवी दरात रुग्णांसाठी उपलब्ध आहेत तरी रुग्णांनी याचा लाभ घ्यावा.”

यावेळी त्यांनी मायक्रोस्कोपचा उपयोग मेंदू आणि मणक्याच्या अतिशय गुंतागुंतीच्या आणि जोखमीच्या शस्त्रक्रिया सहजपणे करणे शक्य होणार आहे अशा प्रकारच्या या मशीनमध्ये 4K – 3D कॅमेरा सिस्टीम मुळे अतिशय सुस्पष्ट दृष्टी आणि त्रिमितीय प्रतिमा दिसणार आहे अशी माहिती यावेळी दिली. यावेळी सिद्धगिरी मठावर भरविण्यात आलेल्या पशु प्रदर्शनाचे उद्घाटन नामदार प्रकाश आबीटकर यांची हस्ते संपन्न झाले.

यावेळी प्रास्ताविक विश्वस्त उदय सावंत यांनी केले. यावेळी कोरेगावचे आमदार महेश शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, गोकुळ दुध संघ संचालक श्री. नंदकुमार ढेगे, विवेक राव पाटील, जालंदर पाटील, शरद सावंत, राजन पाठारे, संतोष पाटील, बाळकृष्ण विचारे, डॉ.वर्षा पाटील, डॉ.प्रकाश भरमगौडर, डॉ. तनिष पाटील, डॉ. शीतल गवळी, डॉ. भाग्यश्री पालकर, विक्रम पाटील, विवेक सिद्ध, संजय पाटील, डॉ. संदीप पाटील, बापू कोंडेकर, माणिक पाटील चुयेकर, नामदेव बामणे, दिवाकर पाटील यांच्यासह महाराष्ट्र, कर्नाटक व गोव्यातून आलेले हजारो भाविक उपस्थित होते.

Previous articleमहाशिवरात्रीनिमित्त देखाव्याचे उद्घाटन
Next articleगोंदी पोलिसांनी चोरी गेलेला ट्रॅक्टर 24 तासात शोध घेऊन चोरास केले जेरबंद
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here