आशाताई बच्छाव
नॅशनल लेवलच्या अबॅकस परीक्षेत जालना ची आरोही रोहित गौड प्रथम
प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 27/02/2025
जालना येथील गोल्डन ज्युबिली शाळेची इयत्ता दुसरीत शिकत असलेली विद्यार्थिनी कु. आरोही रोहित गौड हिने हैदराबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या नॅशनल लेवलच्या अबॅकस परीक्षेत 100 पैकी 100 गुण घेऊन राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळविला आहे सदरील परीक्षेसाठी विविध राज्यातून साधारणत: 1500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यापूर्वीही आरोही गौड हिने जिल्हास्तरावर व राज्यस्तरावर घवघवीत यश मिळविले होते सदरील नॅशनल परीक्षेसाठी तिला अबॅकस शिक्षिका प्रांजल बांगड यांचे मार्गदर्शन लाभले होते सदरील यशाबद्दल आरोही गौड हिचे पंडित मनोज महाराज गौड, गायत्री संस्थांनचे अध्यक्ष किशोर तिवारी, प्रसिद्ध उद्योगपती शिवरतन मुंदडा, राजेंद्र राठी, प्रदीप शहा, हेमंत ठक्कर, यशवंत बदनापूरकर, विप्र फाउंडेशनचे अध्यक्ष रामनिवास गौड, सचिव पवन जोशी ,कोषाध्यक्ष नारायण दायमा, भगवान दायमा, सुरेश शर्मा, रामेश्वर जोशी, मनोज दायमा यांच्यासह गौड परिवारातील सर्वच सदस्यांकडून तिचे कौतुक करण्यात येत आहे