Home बुलढाणा बुलडाणा LCB चे कामच भारी..! गुजरात मध्ये जाऊन बहाद्दराला पकडले; खामगावातील उच्चभ्रू...

बुलडाणा LCB चे कामच भारी..! गुजरात मध्ये जाऊन बहाद्दराला पकडले; खामगावातील उच्चभ्रू वस्तीत केले होते मोठे कांड…

30
0

आशाताई बच्छाव

1001274344.jpg

बुलडाणा LCB चे कामच भारी..! गुजरात मध्ये जाऊन बहाद्दराला पकडले; खामगावातील उच्चभ्रू वस्तीत केले होते मोठे कांड…
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-बुलडाणा देशाच्या काना-कोपऱ्यात आपल्या विविध कारवायांची छाप सोडणाऱ्या बुलढाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुन्हा एकदा गुजरातस्थित उधना (जि. सुरत) मध्ये ‘ऑपरेशन बेडी’ राबवून एका अट्टल घरफोड्याच्या मुसक्या आवळल्या. आरोपीच्या त्याच्या ताब्यातून चोरीतील ४ लाख ५८ हजार ८०० रुपये किमतीचे सोन-चांदीचे दागिने जप्त केले. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या विशेष मार्गदर्शनात व पोनि अशोक लांडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही जोरदार कामगिरी बजावत गांधीनगरमध्ये मातृतिर्थाची छाप सोडली.
गेल्या काळात खामगाव व शेगावमध्ये झालेल्या घरफोडी, जबरी चोरीच्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेवून पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक
थोरात. बी.बी. महामुनी यांनी उपरोक्त गुन्ह्यांचा सखोल तपास करुन गुन्ह्याची उकल करत आरोपीचा शोध घेवून, मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेला आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने पोनि अशोक लांडे यांनी त्यांच्या अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदारांची स्वतंत्र पथके तयार करुन त्यांना जिल्ह्यातील जबरी चोरी, घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करुन गुन्ह्याची उकल, आरोपींचा शोध तसेच गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सचना दिल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here