आशाताई बच्छाव
माजी नगराध्यक्षा योगीताताई पिपरे यांनी केली आदिवासी मुलींच्या
वस्तीगृहाची पाहणी
गडचिरोली , सुरज गुंडमवार ब्युरो चीफ
गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्षा तथा भाजपाच्या जिल्हा महामंत्री योगीताताई पिपरे व भाजपचे लोकसभा समन्वयक तथा माजी नगरसेवक प्रमोद पिपरे यांनी नुकतीच लांझेडा येथील आदिवासी मुलींच्या वस्तीगृहाला भेट दिली. व वस्तीगृहातील समस्येची माहिती जाणुन घेतली. तसेच तेथील व्यवस्थेची पाहणी करून विद्यार्थिनींच्या सोयी-सुविधांबाबत माहिती जाणुन घेतली. याप्रसंगी वस्तीगृहाच्या अधिक्षिका व इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.
यावेळी माजी नगराध्यक्षा योगीताताई पिपरे यांनी वस्तीगृहातोल भेटीदरम्यान संपुर्ण वस्तीगृहाची पाहणी केली. राहण्याची, स्नानगृह, पिण्याचे पाणी व विद्युत व्यवस्थेची माहिती जाणून घेतली. तसेच वस्तीगृहातील विद्यार्थिनींना आदिवासी विकास विभाग व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाकडुन मिळणा-या सोयी-सुविधांची, योजनांची व व्यवस्थेची माहिती जाणुन घेतली. यावेळी वस्तीगृहातील विद्यार्थिनींनी सर्व सुविधा व आदिवासी विभागाच्या योजना नियमित मिळत असल्याचे सागीतले.
यावेळी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करतांना माजी नगराध्यक्षा योगीताताई पिपरे म्हणाल्या, गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी भागातील गरीब मुलींना आदिवासी वस्तीगृहाच्या माध्यमातुन चांगले शिक्षण घेता येत आहे. वस्तीगृहातुन शिक्षण घेणा-या मुलींनी चांगले उच्च शिक्षण घेवुन इंजिनिअर, डॉक्टर, वकील व्हावे. तसेच काही मुलींना राजकारणात आवड असेल तर आमदार, खासदार बनुन जिल्ह्याच्या विकासात हातभार लावावा व समाजसेवा करावी असे सांगीतले.
तसेच यावेळी भाजपच्या जिल्हा महामंत्री योगीताताई पिपरे व माजी नगरसेवक प्रमोद पिपरे यांनी विद्यार्थिनींना नरेंद्र मोदी अॅप व भाजपा सदस्यता नोंदणी बाबत सविस्तर माहिती दिली.