Home बुलढाणा मोठी बातमी ! गृहखाते ‘खादाड!’ -अफूची शेती राजकीय वरदहस्तानेच ! -दंगली घडविणे...

मोठी बातमी ! गृहखाते ‘खादाड!’ -अफूची शेती राजकीय वरदहस्तानेच ! -दंगली घडविणे सरकारचे षडयंत्र ! -काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची जहरी टीका !

27
0

आशाताई बच्छाव

1001268426.jpg

मोठी बातमी ! गृहखाते ‘खादाड!’ -अफूची शेती राजकीय वरदहस्तानेच ! -दंगली घडविणे सरकारचे षडयंत्र ! -काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची जहरी टीका !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा नुकतेच चक्क अफूच्या शेतीमधून तब्बल 12 कोटी 61 लाखांची अफूची झाडे जप्त करण्यात आली. या प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपली तोफ डागत गृह खात्यावर निशाणा साधला. बुलढाणा जिल्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने 22 फेब्रुवारीला 12 कोटी 60 लाख रुपयाची गांजाची झाडे एका शेतातून जप्त
केलीत. या प्रकरणावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, एकटा शेतकरी अशी शेती करू शकत नाही. यामागे राजकीय नेता व राजकीय पाठबळ असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी याची कसून चौकशी करावी. यामागे कोण आहे? हे समोर आणावे. ज्यावेळी बुलढाण्यात अफूची शेती होत होती त्यावेळेस बुलढाण्यासह राज्यातील पोलीस हे हप्ता वसूलीत मशगूल होते, असा हल्लाबोल ही त्यांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, सरकार लाडक्या सत्तेत मशगूल आहे. शेतकऱ्यांना
आता शेती परवडणे कालबाह्य झाले आहे. त्यामुळे शेतकरी आता मादक पदार्थांच्या शेतीकडे वळला आहे. ही धोक्याची घंटा असून सरकारने लवकर सावध व्हावे. अलीकडे सरकार हेच संविधानाला गुंडाळून काम करत आहे. या देशाचा मालक जनता आहे, सरकारने हे विसरू नये. सध्या राज्यात मोठी महसुली तूट निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे राज्य सरकार अनेक योजना बंद करत आहेत. सरकार लाडक्या सत्तेत मशगूल असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here