आशाताई बच्छाव
सिंदखेडराजा जिजामातानगर मध्ये राहणाऱ्या संतोष शिंदे चा क्रूरपणे खून सर्व आरोपींना अटक करा,ऑल इंडिया पॅंथर सेनेची मागणी
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :– सिंदखेडराजा
जिजामातानगर मध्ये राहणाऱ्या संतोष शिंदे चा क्रूरपणे खून,अपहरण करून शेतात डांबून मारहाण करून क्रूरपणे त्याचा बेल्टने गळा आवळून संपवले.. पुरावे नष्ट करण्यासाठी मोतीबाग तलाव ठिकाणी मृतदेह मोठ्या खड्ड्यात फेकून देण्यात आला. पोलीसांनी यातील प्रमुख आरोपी अक्षय मेहर या आरोपी अटक केली आहे.
ऑल इंडिया पँथर सेनेचे सिंदखेडराजा तालुका अध्यक्ष यांनी पीडित कुटुंबाला भेट दिली. ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांनी कुटुंबाशी फोनवरून माहिती घेऊन कुटुंबाला आधार दिला. दिनांक 24 फेब्रुवारी ला सिंदखेड राजा येथे कुटुंबाला भेट देण्यास येत आहे.हे कुटुंब भयभीत असून पोलिसांनी तात्काळ सर्व आरोपीना अटक करावी. अशी मागणी संगणक संघटनेकडून करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.अतिशय गरीब कुटुंब आहे, पीडित दलित असून आरोपी सवर्ण आहे त्यामुळे यात ऍट्रॉसिटी ऍक्टचे कलम लावावे. अपहरण करणे, त्याला संपवणे आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने काही किलोमीटर बॉडी नेऊन फेकणे हे एक आरोपी करू शकत नाही. त्याच्यासोबत आणखीही आरोपी असल्याशिवाय हे शक्य झालेलं नाही. असे देखील त्यांनी सांगितले.राज्यातील एकंदरीत वातावरण बघता ही दलित हत्याकांडाची घटना सुनियोजितपणे घडवली का अशा प्रश्न पडायला लागला आहे. त्यामुळे घटनेची सखोल चौकशी करावी.गृहमंत्री यांनी राज्यात दलितांच्या हत्याकांडाच्या वाढत चालेल्या घटना गांभीर्याने घेऊन सर्व दलित पक्ष संघटनानाची बैठक बोलवून यावर ठोस धोरण आखण्याबाबत इंडिया महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.
कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे, पीडित कुटुंबाला आर्थिक मदत सरकारने जाहीर करावी, पीडित कुटुंबातील सदस्याला शासकीय नोकरी द्यावी विनाकारण तरुण संपवले जात आहेत. दलितांच्या लेकरांना माता जिजाऊ च्या भूमीत संपवलं, या घटनेचा पॅंथरच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त केला.