आशाताई बच्छाव
वडसा येथे पे टू पे सोशियल फाउंडेशन च्या वतीने कन्यादान योजनेअंतर्गत भेटवस्तु व चेकचे वाटप
गडचिरोली -(संजीवभांबोरे)जिल्ह्यातील वडसा येथे पे टू पे सोशियल फाउंडेशन राजस्थान संस्थेमार्फत कन्यादान योजना तर्फे आज 23 फेब्रुवारी 2025 ला वडसा येथील संत गजानन महाराज सभागृहात कन्यादान स्वरूपामध्ये चेक आणि भेट वस्तूचे वाटप करण्यात आले .यात प्रामुख्याने प्रियंका अंबुले, निकिता कनपटे यांना प्रत्येकी 1100 रुपयाचा चेक देण्यात आला आणि अनिल डोंगरवार यांचा पत्नीचा मृत्यू स्वरूपामध्ये 11000 रु आर्थिक मदत चेक संस्थे तर्फे देन्यात आले . त्यांच्या पत्नीचा दान स्वरूपामध्ये त्यांनी आपली नोंद केलेली होती. विवेक झिलपे यांचा सुद्धा एक्सीडेंट दुर्घटना सहाय्यता योजनेमार्फत सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांना सुद्धा 2100 रुपयाचा एक सहाय्यता म्हणून मदत केलेली आहे. तसेच
जयपुर राजस्थान नागपूर विदर्भ ब्रांच मॅनेजर देवदास बारस्कर या संस्थेमार्फत कार्य करीत आहे. यावेळी विष्णू बनसोडे ब्रांच मेनेजर लातुर, डॉ.कडूबा जाधव ब्रांच मेनेजर वसमत, सुशील मेश्राम, अमरकंठ बांडेबुचे, महादेव हट्टेवार, संजय सोनवाने, प्रकाश सार्वे, तुलसीराम गेडाम, शंकर मानकर, अजय धकाते, दामोदर सेलोकर,तिलोत्तमा शेंडे, अनिता सूर्यवंशी, हेमप्रभा कृपाले, यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.