आशाताई बच्छाव
शांतीवन पाथरी (चिचाळ) येथे संत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहत साजरी
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार (पाथरी) चिचाळ येथे आज दिनांक 23 फरवरी 2025 ला सायंकाळी सात वाजता संत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्यासमोर दीप प्रज्वलित करून सामाजिक कार्यकर्त्या सीमा परिवार भंडारा यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, सम्राट अशोक सेनेचे अध्यक्ष तुळशीराम गेडाम, अमरकंठ बांडेबुचे,सुशील मेश्राम, संस्थेचे संचालक जीवनबोधी बौद्ध, हेमप्रभा रूपाले, सुनीता सूर्यवंशी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.