आशाताई बच्छाव
चोपराम गडपायले यांना शिक्षणशास्त्रात पी.एच.डी. (आचार्य) पदवी
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी): स्थानीय लालबहादूर शास्त्री विद्यालय भंडारा येथील शिक्षक चोपराम लक्ष्मणराव गडपायले यांना कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक तर्फे शिक्षणशास्त्र या विषयात आचार्य (पी.एच.डी) पदवी प्रदान करण्यात आली असल्याने त्यांना विद्यापीठाकडून सन्मानित करण्यात आले आहे. *इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रभावात विद्यार्थ्यांवर होणारा दुष्परिणाम*
इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वापरामुळे उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास”हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. त्यांना कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे सहयोगी प्रा. डॉ. अमोल मांडेकर यांनी मार्गदर्शन केले.
चोपराम गडपायले हे सतत शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यात सक्रिय असून याबाबत त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त आहेत .यापूर्वी त्यांना राज्यस्तरीय गुणगौरव शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. भंडारा जिल्हा मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे सचिव असून त्यांनी अनेक शिक्षकांना शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सक्रिय सदस्य आहेत.
विशेष म्हणजे अतिशय हलाखीच्या गरीब परिस्थितीत शिक्षण घेऊन शैक्षणिक प्रगती करून नोकरीवर लागल्यानंतरही आपले शैक्षणिक कार्य सतत सुरू ठेवले.
*शिक्षण क्षेत्रातील पदव्या धारण करण्याचा आदर्श जोपासला*
नोकरीवर लागल्यानंतर त्यांनी बी .ए., बी.एस्सी., बी.लिब.,एम .ए .(मराठी, इंग्रजी, समाजशास्त्र ,राज्यशास्त्र, अर्थशास्त्र ,विषय संप्रेषण) , डिप्लोमा इन कौन्सिलिंग, डिप्लोमा इन ह्युमन राइट्स, डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट , बीएड, एम. एड., पी.एच.डी अशा विविध पदव्या मिळविल्या. त्यांनी चारदा पीएचडी साठीची PET परीक्षा पास केलेली आहे.आपल्या शिक्षणाचा उपयोग विद्यार्थ्यांना, समाजाला व्हावा असे त्यांचे विचार आहेत. नवनवीन गोष्टी शिकून विद्यार्थ्यांना व समाजाला मार्गदर्शन करीत असतात.
दरवर्षी दोन विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांना आर्थिक मदत व शैक्षणिक मार्गदर्शन करीत असतात .ते राज्यस्तर, जिल्हा स्तर, तालुका स्तराचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून सतत शिक्षकांना प्रशिक्षण देत आहेत .
*उत्कृष्ट साहित्य शैली जोपासणारा व्यक्ती महत्व.*
डॉ. चोपराम गडपायले यांनी ‘ सायकॉलॉजी ऑफ लर्निंग अँड डेव्हलपमेंट’ ही पुस्तक प्रसिद्ध झालेली आहे. त्यांचे आठ शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पब्लिश झालेले आहेत. ते नाट्यकलावंत असून विद्यार्थी प्रिय शिक्षक आहेत. त्यांच्या कार्याचा प्रभाव शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात दिसून येतो . त्यांना पी.एच.डी.( आचार्य) पदवी मिळाल्याबद्दल गावातील जनतेने त्यांचा गौरव केलेला आहे तसेच शाळेतील शिक्षक वृंद व पदाधिकारी या सर्वांनी सन्मानित केलेले आहे. एक उत्तम संशोधक म्हणून नानाभाऊ पटोले,जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, भंडारा जिल्हा परिषद चे प्राथमिक शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के व इतर पदाधिकारी यांनी त्यांचे शाल श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन गौरव केले.ते सतत शैक्षणिक प्रबोधन व टीव्ही, मोबाईल व कम्प्युटरच्या अतिवापरामुळे होणाऱ्या वाईट परिणामा बाबत चे प्रबोधन विद्यार्थ्यांना लाभदायी ठरणार आहे.
त्यांनी आपल्या यशस्विते चे श्रेय मार्गदर्शक डॉ. अमोल मांडेकर, डॉ.अरुण धकाते, डॉ. पांडुरंग कोडवते, शेखर बोरकर, प्रा.डॉ.युवराज खोब्रागडे, नरेश भुरे, देवानंद घरत, आई वडील ,पत्नी, मुलगा आर्यन, परिवारातील सदस्य, मित्रमंडळी, नातेवाईक आणि शुभचिंतक यांना दिले आहे.