आशाताई बच्छाव
भोकरदन पंचायत समितीच्या सभागृहात प्रधानमंत्री आवास योजना 2024 25 च्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण 7100 शे लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे पत्र वितरण ..
युवा मराठा न्यूज नेटवर्क रिपोर्टर गजेंद्र लोखंडे भोकरदन
भोकरदन येथील पंचायत समिती कार्यालयातील सभागृहामध्ये आमदार संतोष भाऊ दानवे माजी खासदार व माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजना 2024 25 च्या मंजूर लाभार्थीना प्रथम हप्ता पत्राचे वितरण करण्यात आले गटविकास अधिकारी गजानन सुरडकर यांनी प्रथम माजी खासदार तथा माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला भोकरदन जाफराबादविधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष रावसाहेब पाटील दानवे यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमास गणेश बापू ठाले कैलास पुंगळे व इतर पदाधिकारी तसेच पंचायत समितीतील कर्मचारी विस्तार अधिकारी ग्रामसेवक ग्रामसेविका हजर होते दहा हजार 70 लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुलांना मंजुरी मिळालेली असून अशांना भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते मंजुरी पत्र वितरीत करण्यात आले व 7100 लाभार्थ्यांना प्रथम हप्ता पत्र वितरीत करण्यात आली