Home जालना तहसील कार्यालय भोकरदन येथे संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती साजरी

तहसील कार्यालय भोकरदन येथे संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती साजरी

70
0

आशाताई बच्छाव

1001264588.jpg

तहसील कार्यालय भोकरदन येथे संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती साजरी
युवा मराठा न्यूज नेटवर्क भोकरदन तालुका प्रतिनिधी गजेंद्र लोखंडे
आज दिनांक 23 फेब्रुवारी रोजी श्री संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती श्री संत गाडगेबाबा गाडगेबाबा महाराज यांचा जन्म 23 फेब्रुवारी 18 76 रोजी झाला आज त्यांची जयंती तहसील कार्यालय भोकरदन या ठिकाणी साजरी करण्यात आले श्री संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्री पाखरे सर यांनी जयंती साजरी केली यावेळी कार्यालयीन कर्मचारी तसेच इतर नागरिक उपस्थित होते श्रीपाखरे सर यांनी संत गाडगेबाबा यांच्या कार्याबद्दल दोन शब्दात आपले मनोगत व्यक्त केले श्री संत गाडगेबाबा यांच्या वाणीतून नेहमी कबीरांचे दोहे ऐकायला मिळत होते श्री संत गाडगेबाबा महाराज यांनी अनिष्ट परंपरा व रूढी तसेच अंधश्रद्धा यापासून नागरिकांना दूर राहण्याचा सल्ला दिला जात होता श्री संत गाडगेबाबा महाराज ज्या गावात जातील त्या गावात स्वच्छता करायचं काम करत असताना स्वच्छतेच्या मोबदल्यात एखाद्या नागरिकांनी जर पैसे दिले तर त्या पैशातून गोरगरिबांसाठी अन्न व रोगांसाठी औषधी तसेच नागड्यांना साठी कपडे घेत असे श्री संत गाडगेबाबा यांनी नेहमीच नागरिकांना एक सल्ला दिला की आपण कमवलेल्या पैशातून थोडासा का होईना गरिबांसाठी दान म्हणून करा किंवा गरिबांना मदत म्हणून करा असे संत गाडगेबाबा नागरिकांना सांगायचे गाडगेबाबा स्वच्छता करत असताना व नेहमी एक आनंदी राहायची त्यांच्या मुखामध्ये नेहमी एक गीत असायचे गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे वाक्य गात असताना हाती घेतलेले स्वच्छतेचे काम केव्हा संपून जायचं त्यांना सुद्धा कळत नसेल एवढे श्री संत गाडगेबाबा महाराज लीन होऊन काम करायची.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here