आशाताई बच्छाव
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारला बॉम्बनं उडवण्याची धमकी देणाऱ्यांना देऊळगाव महीत ठोकल्या बेड्या…..
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :– बुलडाणा बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव मही येथील दोन जणांनी चक्क उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी गुरुवारी देण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली. गोरेगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा
दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. सविस्तर वृत्त असे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल गोरेवाव पोलीस ठाण्यात करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखा आणि बुलडाणा पोलिसांच्या संयुक्त पथकाने दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. देऊळगाव मही येथील मंगेश अच्युतराव वायाळ (वय वर्ष 35)व अभय गजानन शिंगणे (वय वर्ष 22) या दोघांना पोलिसांनी देऊळगाव मही इथून अटक केली आहे. या दोघांनाही घेऊन पोलीस मुंबईला निघाले आहेत. या दोघांवर गोरेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 351(3), 351(4), आणि 353(2) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.