Home बुलढाणा ब्रेकिंग ! म्हणे…. उपमुख्यमंत्री शिंदेंना बॉम्बने उडविणार! – धमकी देणारे बुलढाणा -जिल्ह्यातील...

ब्रेकिंग ! म्हणे…. उपमुख्यमंत्री शिंदेंना बॉम्बने उडविणार! – धमकी देणारे बुलढाणा -जिल्ह्यातील देऊळगाव माहिचे! – आ. श्वेता महाले यांनाही जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र !

82
0

आशाताई बच्छाव

1001259589.jpg

ब्रेकिंग ! म्हणे…. उपमुख्यमंत्री शिंदेंना बॉम्बने उडविणार! – धमकी देणारे बुलढाणा -जिल्ह्यातील देऊळगाव माहिचे! – आ. श्वेता महाले यांनाही जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय वाहन बॉम्बने उडवून दिले जाईल, अशी धमकी गुरुवारी शहरातील काही पोलीस ठाणे आणि मंत्रालयाला ई-मेलद्वारे प्राप्त झाली. याप्रकरणी गुन्हे शाखेने दोन तरूणांना ताब्यात घेतले आहे दोघेही बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्यांना मुंबई आणण्यात येत आहे. दरम्यान चिखलीच्या भाजपा आ. श्वेता महाले यांनाही जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र मिळाल्याची माहिती आहे.
शिवसेनेचे पक्ष प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठार मारण्याची धमकी काल देण्यात आली. एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात हा धमकीचा ई-मेल आला आहे. पोलिसांनी ई-मेल पाठणाऱ्यांचा शोध सुरू केला. मुंबईतील इतर पोलीस ठाण्यांमध्येही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याच्या धमकीचा मेल आला होता. ई-मेलमध्ये एकनाथ शिंदे यांची मोटार बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. गोरेगाव पोलीस ठाण्याला शिंदे यांचे शासकीय वाहन उडवून देण्याबाबत धमकीचा ई-मेल प्राप्त झाला होता. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३५१(३), ३५१ (४) व ३५३ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी गुन्हे शाखेने तपास करून मंगेश अच्युतराव वायळ (३५) व अभय गजानन शिंगणे (२२) यांना ताब्यात घेतले असून दोघेही बुलढाणा जिल्ह्यातील देऊगाव येथील रहिवासी आहेत. त्यांना मुंबईत आणण्यात येत आहे. धमकीचा ई-मेल आल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
आहे

Previous articleमाहोरा येथे छत्रपती शिवरायांची मिरवणूक काढून मोठ्या जल्लोषात शिवजयंती साजरी
Next articleछत्रपतींचे विचार आत्मसात करून आचरण करणे काळाची गरज -पत्रकार संदिप जाधव
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here