आशाताई बच्छाव
माहोरा येथे छत्रपती शिवरायांची मिरवणूक काढून मोठ्या जल्लोषात शिवजयंती साजरी
जाफराबाद तालुका प्रतिनिधी मुरलीधर डहाके
दिनांक 21/02/2025
सविस्तर वृत्त असे की जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथे 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 8 वाजेपासून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक छञपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्यापासून सुरुवात झाली. त्यानंतरच माहोरा गावातून वाजत गाजत तसेच फटक्यांची अतशबाजी करत मिरवणूक पूर्ण माहोरा नगरीतुन नेण्यात आली. गावामध्ये ठीक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे शिवभक्त महिला व पुरुष यांनी पूजन करुन अभिवादन केले. मिरवणुकीची सांगता छत्रपति शिवाजी महाराज चौकात महाराजांची आरती घेऊन करण्यात आली. आरती जाफराबाद पोलीस स्टेशनचे पी.आय.इंगळे साहेब यांच्या हस्ते घेण्यात आली. तसेच मिरवणुकीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जाफराबाद पोलीस स्टेशनचे ठाणेदार इंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.निरीक्षक देठे(पवार) आणि त्यांचा पुर्ण स्टॉप यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.अशा प्रकारे मिरवणूक रात्री 10 वाजता शांततेत पार पडली.