Home जालना सहकार बँक कॉलनीत गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा उत्साहात साजरा!

सहकार बँक कॉलनीत गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा उत्साहात साजरा!

23
0

आशाताई बच्छाव

1001257757.jpg

सहकार बँक कॉलनीत गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा उत्साहात साजरा!
जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ: येथील सहकार बँक कॉलनीतील गजानन महाराज मंदिरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प. पू. डॉ. भगवान महाराज आनंदगडकर यांच्या कृपाशिर्वादाने गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान, या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते. तर उद्या हभप श्री. संत डॉ. भगवान बाबा आनंदगडकर यांचे काल्याचे किर्तन आणि नंतर महाप्रसादाने या सप्ताहाची सांगता होणार असल्याचे संस्थानचे सचिव संपतराव पाटील व विश्वस्त मंडळाने कळविले आहे. दरम्यान, काल रात्री हभप उध्दव महाराज वाघमारे यांचे किर्तन झाले. त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या ओवींवर आधारित कीर्तन केले. या कीर्तनातून त्यांनी आजच्या जीवनावरील विविध उदाहरणे आपल्या कीर्तनातून दिली. त्यावेळी उपस्थितांनी त्यांना चांगलीच दाद दिली. ज्यांची संपूर्ण माया ही देवाजवळ आहे, ते खरे भाग्यवंत आणि सुखी असल्याचेही सांगून ते म्हणाले की,  कुणाला अंतरंग आवडतात तर कुणी बाह्य रंगावर जातात. परंतू मनुष्याचे अंतरंग नेहमीच चांगले आणि सुंदर असायला हवे. तन आणि धन यां मधला फरकही त्यांनी यावेळी स्पष्ट करुन सांगितला.
——————————————————

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here