आशाताई बच्छाव
जालना सहकारी साखर कारखान्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश
जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ: खा. डॉ. कल्याण काळे यांनी क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त कौशल सिंग यांच्यासोबत बैठक घेऊन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवण्याच्या दृष्टीने आवश्यक कारवाई करण्याचे आदेश दिले.
या बैठकीत निवृत्तीवेतन, भविष्य निधी आणि इतर थकबाकीच्या प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. जालना सहकारी साखर कारखाना मर्या. रामनगर येथील अनेक कामगारांना भविष्यातील सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेली पेन्शन आणि भविष्य निर्वाह निधीच्या रकमेची विलंबामुळे अडचण निर्माण झाली आहे.
कामगारांच्या मागणीनुसार—
1. UAN नंबर न मिळणे: 2014 पासून सुरू असलेल्या प्रक्रियेत अनेक कामगारांना अद्याप UAN क्रमांक मिळालेला नाही, यावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
2. थकबाकी रक्कम खात्यात जमा करणे: साखर कारखान्याने 2010 मध्ये भरलेली ₹5,83,22,342/- ची रक्कम अजूनही कामगारांच्या खात्यात जमा झालेली नाही, ती त्वरित वर्ग करावी.
3. पेन्शन वाढीव मिळण्यासाठी कार्यवाही: न्यायालयाच्या निर्णयानुसार वाढीव पेन्शन मंजूर करण्यासाठी आवश्यक कार्यवाही तत्काळ करण्यात यावी.
4. PF थकबाकी भरपाई: कारखान्याने कर्मचार्यांच्या वेतनातून कपात केलेली PF रक्कम दंड व व्याजासह भरावी आणि संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्याची संपूर्ण माहिती पुरवावी.
खा. डॉ. काळे यांनी यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे जालना आणि परिसरातील शेकडो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.या बैठकीस जालना साखर कारखान्याचे श्री रामेश्वर डोंगरे, संतोष देशमुख, साहेबराव कांदे, दत्तू जुंबड, भिकाजी गवार, ज्ञानेश्वर औटे, आदी उपस्थित होते.